जोशी वडेवाले यांच्या माणगाव मधील हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेल चालक यांच्यात हाणामारी झाली होती. त्याचा व्हिडीओ ही व्हायरल झाला होता. त्यात हॉटेल चालकाने ग्राहकांनी मारहाण केल्याचे दिसत होते. शिवाय त्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार ही दाखल करण्यात आली होती. पण आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यात ग्राहकांनीच पहीले मारहाण आणि हमरीतूमरी केल्याचा आरोप हॉटेल चालकाने केले आहे. त्याने त्याच सीसीटीव्ही व्हिडीओ ही समोर आणला आहे. त्यामुळे त्या दिवशी नक्की काय झालं याची दुसरी बाजूही समोर आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माणगाव येथील जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये महिला ग्राहक आणि हॉटेल चालक यांच्यातील वाद आणि मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यात हॉटेल चालकाने मारहाण केल्याचे समोर आले होते. त्यानंतर तक्राही दाखल करण्यात आली होती. पण आता हॉटेल चालकाने एक व्हिडीओ समोर आणला आहे. त्यात त्यांनी सीसीटीव्ही व्हिडीओ दाखवला आहेत. त्यात त्या दिवशी नक्की काय झाले हे सांगितले आहे. त्यात ग्राहकांनीचा वाद घातला त्यानंतर हाणामारी केली असा जोशी वडेवाले हॉटेल चालकाचा दावा आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही' ठाकरेंनी माघार का घेतली? थेट कारण सांगितलं
त्यांनी आपलं म्हणण हॉटेलमधील CCTV फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट केल आहे. वड्यामध्ये मीठ जास्त असल्यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर ग्राहकांनी काऊंटरवरील काँप्युटरची तोडफोड केली. तर महिलांनी चप्पल काढून हॉटेल चालक आणि कामगारांना मारहाण केली, असल्याचे हॉटेल चालक शुभम जैसवाल यांचे म्हणणे आहे. त्यांनी आता त्याचा व्हिडीओ माध्यमांना दिला आहे. मात्र त्यावेळी ग्राहकांनी त्यांच्याकडील व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल केला.पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामुळे व्यवसायीक म्हणून आमची बदनामी होत असल्याचे जैसवाल यांनी सांगितले. त्या मुळे संबधित ग्राहकांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे जैसवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केल आहे.