महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर का मी त्याला पाठिंबा देतो असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. शिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा आहे असे वक्तव्य संजय राऊत यांनी ही केले होते. त्यानंतर शरद पवारांनी कशात काही नसताना मुख्यमंत्री कोण हे ठरवण्या आधी महायुतीचे सरकार घालवले पाहीजे, ज्याती संख्या जास्त तो मुख्यमंत्री होईल असे स्पष्ट केले होते. काँग्रेसनेही अशीच भूमिका मांडली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मवाळ झाली होती. मुख्यमंत्रिपदावरून वाद नाही निवडणुकीनंतर ठरूअसं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं होतं. आता तर उद्धव ठाकरे यांनीच या विषयाला पूर्ण विराम देत सर्वच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी नाही. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला बॅकफूटवर यावं लागलं आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री होण्याचे तेव्हाही स्वप्न नव्हते. आताही हे स्वप्न नाही. माझ्यासाठी माझा महाराष्ट्र महत्वाचा आहे. महाराष्ट्रातली जनता हीच माझी सत्ता, तिच माझी ताकद आहे असे वक्तव्य करत एक प्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली आहे, अशी चर्चा सुरू झाली.
ट्रेंडिंग बातमी - भावी मुख्यमंत्री! महायुतीत आता 'या' दोन नेत्यांचे झळकले बॅनर
उद्धव ठाकरे यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी आयोजित कार्यक्रमाला शिर्डी इथे हजेरी लावली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जुन्या पेन्शन योजना लागू करण्याचा शब्द कर्मचाऱ्यांना दिला. पण हे सरकार घालवा असे आवाहनही त्यांनी केले. आता मी शब्द दिला आहे. त्यामुळे आताचं सरकार कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णयही देईल पण त्यांला भुलू नका असे ही ते म्हणाले. अचानक त्यांना लडक्या बहिणीची आठवण आहे. त्यामुळे ते तुमच्या बरोबर ही दगाफटका करतील त्या पासून सावध राहा. ज्या शिवसेने त्यांना राजकी जन्म दिला. त्या शिवसेनेचा काहींनी विश्वासघात केला असा आरोपही ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव न घेता केला. त्यांना मी कुटुंबासारखे मानले होते पण त्यांनी फसवले असेही ते म्हणाले.
हे सरकार गेल्यात जमा आहे. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यावेळी आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. सत्तेची चिंता शिवसेनेला नाहीय. तुमच्या आयुष्याची चिंता आम्हाला आहे, राज्यातलं प्रत्येक कुटुंब चांगल्या पद्धतीने राहीलं पाहीजे याबाबत आमची चिंता आहे. सत्ता ही येणार आहे. त्याची चिंता तुम्ही करू नका. या सरकारला आता टेन्शन आहे. त्यामुळे तुम्ही तुमची एकजुट सोडू नका असेही ते म्हणाले.
नक्की वाचा - 10 वर्षांनी पाळणा हलला, बारसं करून पुण्याला जाताना कुटुंब संपलं; ड्रिंक अँड ड्राइव्हमुळे 4 हकनाक बळी!
पेश्नशच्या मागणीसाठी उपोषण करू नका. जनता आधीच उपाशी आहे. उलट सत्ताधाऱ्यांना सत्तेशिवाय उपाशी राहायला लावा असे आवाहन ही त्यांनी केले. त्या पद्धतीचे आवाहन त्यांनी केले. लाडकी बहीण योजना आणली आहे. पण भाऊ कोण हेच बहिणींना समजत नाही. प्रत्येकजण मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ असे म्हणतो आहे. मात्र ते भाऊ नसून फुकटखाऊ आहेत. जनतेच्या पैशांवर फुकटखाऊ म्हणतात मीच तुझा भाऊ असे सध्या सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world