Noida Crime : नवी दिल्लीत एका लग्नाच्या वरातीत अडीच वर्षांच्या मुलाचा हकनाक बळी गेला आहे. इमारतीखाली लग्नाची वरात पाहण्यासाठी हा लहानगा घाईघाईने गॅलरीत येऊन बसला. वरातीत मोठमोठ्याने ढोल वाजवले जात होते. सर्वजण आनंदान नाचत-गात होते. मात्र वरात पाहत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने नवी दिल्ली जवळील नोएडा परिसरात खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तरेकडील राज्यांमध्ये लग्नाच्या वरातीत हवेत गोळ्या झाडल्या जातात. याला हर्ष फायरिंग म्हणतात. लग्नात आनंद साजरा करण्यासाठी अशा प्रकारचं फायरिंग केलं जातं. नोएडामध्ये गुडगाववरुन नवरदेवाची वरात आली होती. यावेळी वरातीत हवेत गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी शेजारील इमारतीच्या गॅलरीतून अंश शर्मा नावाचा अडीच वर्षांचा लहानगा वडिलांसोबत वरात पाहत होता.
त्याचवेळी एक गोळी त्याला लागली. यानंतर अंशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हर्ष फायरिंग करणाऱ्या हॅप्पी नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे इमारतीवरुन एक व्यक्ती वरात शूट करीत होती. आणि त्याच घरात हा सर्व प्रकार घडल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे.