रोबोटची घेतली मदत, अनेक तासांचं ऑपरेशन; नवी दिल्ली स्टेशनवरील ग्रेनेड निकामी करण्यास NSG ला यश 

शुक्रवारी रात्री साधारण 9 वाजता NSG ची टीम घटनास्थळी पोहोचली आणि 12 वाजता रोबोटच्या मदतीने दोन्ही ग्रेनेड निकामी केले. 

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपासून 100 मीटर अंतरावर एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शुक्रवारी (31 मे) रात्री पोलिसांना दोन छोटे ग्रेनेड सापडले. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला. यानंतर NSG टीम घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही ग्रेनेड निकामी करण्यासाठी ऑपरेशन केले. अनेक तासांच्या ऑपरेशननंतर दोन्ही ग्रेनेड निकामी करण्यात आले.

शुक्रवारी रात्री साधारण 9 वाजता NSG ची टीम घटनास्थळी पोहोचली आणि 12 वाजता रोबोटच्या मदतीने दोन्ही ग्रेनेड निकामी केले. 

नक्की वाचा - अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनजवळ मिळालेल्या दोन संशयास्पद ग्रेनेड शुक्रवारी रात्री उशीरा एनएसजीच्या टीमने निकाली केले. रोबोटच्या मदतीने ही दोन्ही ग्रेनेड निकामी करण्यात आले. गुरुवारी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपासून 100 मीटर अंतरावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पोलिसांनी दोन ग्रेनेड सापडले होते. यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला. यानंतर एनएसजीच्या टीमला पाचारण करण्यात आलं. तासनतास सुरू असलेल्या ऑपरेशननंतर एनएसजीने दोन्ही ग्रेनेड निकामी केले. शुक्रवारी रात्री साधारण 9 च्या सुमारास एनएसजीची टीम रेल्वे स्टेशनवर पोहोचली होती. यानंतर साधारण 12 वाजता रोबोटच्या मदतीने दोन्ही ग्रेनेड निकामी करण्यात आलं. 

यापूर्वी पोलिसांनी सांगितलं होतं की, रेल्वे स्टेशनजवळ पहाडगंजच्या दिशेने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही संशयास्पद वस्तू आढळल्या होत्या. बॉम्ब स्क्वॉडने याचा तपास केला तेव्हा याच विस्फोटक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेले ग्रेनेड हे प्रत्यक्षात सैन्याच्या ट्रेनिंगमध्ये वापरले जाणारे ग्रेनेड होते. या ग्रेनेडमध्ये फटाक्यांमध्ये वापरलेली दारू भरण्यात येते, अशा बॉम्बचा वापर ट्रेनिंगसाठी केले जातो.