नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार

कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण देश संतप्त आहे. त्याचवेळी देशातील वेगवेगळ्या भागातील हॉस्पिटमध्येही याच प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

कोलकातामधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण देश संतप्त आहे. त्याचवेळी देशातील वेगवेगळ्या भागातील हॉस्पिटमध्येही याच प्रकारच्या घटना उघडकीस येत आहेत. एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरानंच तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणात आरोपी डॉक्टर शाहनवाज मलिकला अटक करण्यात आलीय. तर वॉर्ड बॉय जुनैद आणि नर्स मेहनाजला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातीाल मुरादाबादमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. या प्रकारात हॉस्पिटलमधील डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि नर्स सहभागी होते. पीडित महिलेच्या वडिलांनी पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनुसार, 'त्यांची 20 वर्षांची मुलगी मुरादाबादमधील एव्हीएम हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून काम करत आहे. शनिवारी संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास त्यांची मुलगी नाईट ड्यूटीसाठी हॉस्पिटलमध्ये गेली. त्यावेळी हॉस्पिटलमधील एक नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी तिला तुला डॉक्टर शाहनवाज यांनी खोलीमध्ये चर्चा करण्यासाठी बोलावलं असल्याचं सांगितलं.'

 ( नक्की वाचा : मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला, आरोपी फरार )
 

पीडितेच्या वडिलांनी पुढं सांगितलं की, 'नर्स आणि वॉर्ड बॉयनं सूचना दिल्यानंतर त्यांच्या मुलीनं डॉक्टरांच्या रुममध्ये जाण्यास नकार दिला. त्यावेळी वॉर्ड बॉय जुनैद आणि नर्स मेहनाजनं तिला जबरदस्तीनं डॉक्टर शाहनवाज यांच्या हॉस्पिटलमधील खोलीत नेलं. त्यांनी ती खोली बाहेरुन लॉक केली. या आरोपानुसार रात्री साधारण 12 च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांच्या मुलीला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. डॉक्टरांनी पीडित महिलेला जातीवाचक शब्दांचा वापर करत जीवे मारण्याची धमकी दिली.'

Advertisement

वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केलय. तसंच वॉर्ड बॉय आणि नर्सलाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी पीडित महिलेची सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट केली आहे. तिच्याकडून या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. 

Topics mentioned in this article