Odisha Raid News: ओडिसामध्ये एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर रेड टाकल्यानंतर जो कुबेराचा खजिना आढळून आला त्याने दक्षता अधिकारीही चक्रावून गेल्याचे प्रकरण समोर आलं आहे. एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याने (एईई) महिन्याला केवळ ६,००० रुपये पगारावर नोकरीला सुरुवात केली होती, पण त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले. या छाप्यात, एईईच्या बँक लॉकरमधून अंदाजे २ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Pune News: WhatsApp ग्रुप जॉईन करणं महागात पडलं, IT इंजिनिअरला 4.43 कोटींचा गंडा
९ ठिकाणी एकाच वेळी छापे
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी, ओडिशा दक्षता विभागाने कंधमाल जिल्ह्यातील बालिगुडा येथील आयटीडीएमध्ये कार्यरत असलेले एईई बैकुंठनाथ बेहरा यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणात कारवाई केली. पथकाने भुवनेश्वर, जाजपूर, बारीपाडा आणि बालिगुडा येथील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते.
पाच आलिशान घरांचा पर्दाफाश
तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना अनेक मोठी आणि महागडी घरे आढळून आली. आतापर्यंत पाच बहुमजली इमारती उघडकीस आल्या आहेत. यामध्ये भुवनेश्वरच्या नीलाद्री विहारमधील सुमारे १०,५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या चार मजली घराचा समावेश आहे. शैलाश्री विहार, कानन विहार, चंद्रशेखरपूर आणि जाजपूरच्या धर्मशाळा परिसरातही घरे आढळून आली.
१३ मौल्यवान भूखंडही सापडले
केवळ घरेच नव्हे, तर तपासात १३ वेगवेगळे भूखंडही उघडकीस आले. यापैकी सात भूखंड भुवनेश्वरच्या प्रमुख भागांमध्ये आहेत. या सर्व मालमत्तांचे बाजारमूल्य खूप जास्त असल्याचे सांगितले जात असून त्याचे मूल्यांकन केले जात आहे. छाप्याच्या सुरुवातीला अंदाजे २,६६,००० रुपये रोकड जप्त करण्यात आली होती, परंतु तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे चित्र अधिक स्पष्ट झाले. बँकेच्या लॉकरच्या झडतीतून अंदाजे २ कोटी रुपये रोकड जप्त झाल्याची पुष्टी झाली. सध्या आणखी दोन लॉकरमध्ये तपास सुरू आहे.
(नक्की वाचा- Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)
अधिकाऱ्यांची पथके सोन्याचे दागिने, बँक ठेवी, पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आणि इतर आर्थिक गुंतवणुकींचीही चौकशी करत आहेत. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य मोजण्याचे काम तांत्रिक पथक करत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बैकुंठनाथ बेहरा यांनी १९९९ मध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, तेव्हा त्यांचा पगार सुमारे ६,००० रुपये होता. कालांतराने, त्यांना एईई (AEE) पदावर बढती मिळाली, परंतु त्यांच्या संपत्तीत झालेल्या लक्षणीय वाढीमुळे तपास यंत्रणांना संशय आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world