NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!

ओडिसातील 24 वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील वसतिगृहात संशयास्पदरित्या मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओडिसातील 24 वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील वसतिगृहात संशयास्पदरित्या मृतदेह सापडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभयपूर निवासी रोशन कुमार पात्रा हा नीट-युजी परीक्षेची तयारी करीत होता. गांधीनगरमध्ये राहणारा हा विद्यार्थी चुलत भाऊ आणि मित्रांसोबत राहत होता. NDTV शी बोलताना रोशनचे वडील राधेश्याम यांनी सांगितलं, काल रात्री मी मोबाइलवरुन मुलाशी बोललो. तो खूप खुश होता. त्याने साधारण 40 मिनिटं आमच्याशी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून बातचीत केली. मात्र काही वेळाने जेव्हा रोशनच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा त्याचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात आणि निर्वस्त्र अवस्थेत होता. 

मुलगा खूप खूश होता, आत्महत्या करणं अशक्य...

NDTV सोबत बोलताना रोशनचे वडील राधेश्याम यांनी सांगितलं की, काल रात्री आम्ही मुलाशी बोललो तेव्हा तो खूप खूश होता. त्याच्यासोबत ४० मिनिटांपर्यंत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉवर बातचीत केली.   मात्र काही वेळाने जेव्हा रोशनच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा त्याचा मृतदेह बेडवर रक्ताच्या थारोळ्यात आणि निर्वस्त्र अवस्थेत होता. मात्र रोशन आत्महत्या करू शकत नाही. माझा मुलगा करिअरमध्ये नेहमी पुढे होता. 

नक्की वाचा - Satara Doctor Death प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाल बदने अखेर...

रात्री अभ्यास करीत होता, सकाळी दार उघडलं नाही...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार आणि त्याचे मित्र रात्री उशीरापर्यंत अभ्यास करीत होते. मात्र सकाळी रोशनने दार उघडलं नाही. त्यांना वाटलं तो झोपला असेल. दुपारी जेवणासाठीही तो बाहेर आला नाही. त्यानंतर त्यानी दार ठोठावलं. आतून कोणतंही प्रत्युत्तर न आल्याने वॉर्डनला माहिती देण्यात आली. 

Advertisement

वॉर्डनने डुप्लिकेट चावीने रोशनच्या खोलीचं दार उघडलं. खोलीत प्रवेश केल्यावर, कुमार बेडवर तोंडावर पडलेला आढळला. पोलिसांना कळवण्यात आले आणि कुमारला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्थानिक पोलिस त्याच्या मृत्यूचे कारण तपासत आहेत.