Palghar News: पालघरमध्ये रात्रीस खेळ चाले! चोरीसाठी आले अन् फसले, 7 जणांच्या मुसक्या आवळल्या

या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून चेहरा लपवला होता, त्यांच्या हातात लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि पिस्तूल होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर:

Palghar Robbery:  पालघरच्या नानिवली गावात दरोड्याचा प्रयत्न केलेल्या सात आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. घरमालकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी सातही आरोपींना पकडण्यात आले आहे. मध्यरात्री झालेला हा दरोड्याचा प्रयत्न आणि घटनास्थळावरून पळ काढतानाचा घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यात कैद कैद झाला आहे. 

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! 11 आरोपींविरोधात 1600 पानांचे चार्जशीट दाखल

समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातल्या नानिवली गावातील प्रसाद विजय पाटील यांच्या घराचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडत असताना, याप्रसंगी घाबरून न जाता प्रसाद पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने दरोडवखोरांनी पळ काढला होता. या दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून चेहरा लपवला होता, त्यांच्या हातात लोखंडी रॉडने दरवाजा तोडत होते, तसेच त्यांच्या हातात चिकटपट्टी आणि पिस्तूल होते.

Advertisement

हा दरोड्याचा प्रयत्न आणि घटनास्थळावरून पळ काढतानाचा घटनाक्रम येथील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता.  याप्रकरणी प्रसाद पाटील यांनी मनोर  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गंभीर दखल घेत मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष पथकाची नेमणूक करून दरोडेखोरांना तातडीने अटक कारण्याच्या सूचना दिल्या. 

Advertisement

Shirdi News: शिर्डीत भरदिवसा रस्त्यावरच सुरू आहेत नको ते धंदे, अनैतिक प्रवृत्तींचा शहराला विळखा?

पोलिसांच्या विशेष पथकाने  घटनास्थळी पाहणी करून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबरीच्या माहितीनुसार कासा वळवी पाडा येथून संदीप अशोक वळवी, तुषार गणेश रटाटे, ऋषिकेश भगवान गुरव (कुंज, विक्रमगड ), रामदास रमेश सालकर (देहरजे, विक्रमगड), प्रणय गंगाराम गावित (धामणी, विक्रमगड), अमोल अशोक वांगड (वाघाडी, डहाणू), भरत जयवंत मेढा (घाणेघर, विक्रमगड) या सात आरोपींना त्यांनी गुन्ह्यात वापरलेली इको कार सह ताब्यात घेतले. आरोपींना पोलिसी खाक्या दाखकवताच त्यांनी गुन्हा कबूल केला असून त्यांना पालघर  येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केली असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

Advertisement