Pandharpur Crime: माय-लेकाचा मर्डर! 2 वेळा सुटला, पण एका शायरीमुळे आरोपी सापडला; भयंकर क्राईम स्टोरी

पोलिसांना खून झाल्याची माहिती देणाराच या हत्याकांडात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून अत्यंत शिताफीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला.

जाहिरात
Read Time: 4 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर:

Pandharpur Double Murder Case Mystery:  पंढरपूरमध्ये  झालेल्या माय-लेकाच्या डबल मर्डर केसचा तब्बल सात महिन्यांनी सर्वात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांना खून झाल्याची माहिती देणाराच या हत्याकांडात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून अत्यंत शिताफीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला. या प्रकरणात दोघांसह एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या... 

मायलेकाच्या मर्डरची भयंकर मिस्ट्री.. 

समोर आलेल्या माहितीनुसार, पंढरपुर शहरात  १५ जूलै रोजी सुरेखा संजय जगताप (वय ५५) व यांचा मुलगा लखन संजय जगताप (वय २५) या दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपी विशाल शिंदेने लखन संजय जगताप यावर अंदाजे १६ वार केले होते. पहिलाच वार ऐवढा भयानक होता, यामुळे लखनला आवाज करता आला नाही. या खुनानंतर संशयीत आरोपी विशाल शिंदे नाईक बाहेर येताच, लखनची आई सुरेखा यांनी विशालला ओळखले. यामुळे त्याने त्यांच्या तोंडावर देखील वार केले. त्यानंतर मागून अथर्वने वार केले, ज्यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला. 

Metro Pillar Collapse: मुलूंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला! एकाचा मृत्यू, भयंकर व्हिडिओ समोर

साहेब खून झालेत, पोलिसांना माहिती देणाराच निघाला आरोपी

 हे दोन खून अवघ्या १० मिनीटात झाले. खुनासाठी विशालने घरातील गवत कापायच्या मशीनचे पाते काढून त्याने हत्यार तयार केले होते. हत्येनंतर आरोपींना घरातील टीव्ही तसेच हत्येत वापरलेले हत्यार नदीत फेकून दिले. धक्कादायक म्हणजे त्याच आरोपींनी घरी आल्यानंतर पोलिसांना फोन करुन खून झाल्याची माहिती दिली. पोलिसांना तो तपासकार्यातही मदत करत होता. 

या हत्येनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अतूल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस अधीक्षक डॉ प्रशांत डगळे यांनी तपासाची सूत्रे घेऊन  सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाच्या मदतीने गुन्हाचा तपास सुरु केला.   पंढरपूर शहरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण पाहून संशयित लोकांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या परिसरात त्या दिवशी असलेल्या मोबाईल टॉवरच्या नजीकच्या लोकेशन नुसार संबंधित व्यक्तींना देखील पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र तरीही सात महिने पोलिसांच्या हाती निराशाच आली.

कॉल रेकॉर्ड अन् एका शायरीने लागला सुगावा..

अशातच पोलिसांना एक माहिती मिळाली. संशयीत आरोपी विशाल शिंदे नाईक याचा घटनेच्या वेळी ६० मिनिट (एक तास) फोन बंद होता. गुन्हा घडण्याच्या पूर्वी विशाल शिंदे याचे अर्थव शिंदे नाईक याच्याबरोबर ११ सेंकदाचे फोनवर बोलणे झाले होते. याचा धागादोरा पोलीसांनी पकडून तपास सुरु केला. त्यानंतर या दोघांना मदत करणाऱ्या विधी संघर्ष बालकाकाडून माहीती घेण्यासाठी पोलीसांनी सापळा रचून गुप्तचर पेरला.

Advertisement

त्या गुप्तचर व्यक्तीला पोलिसांंनी बक्षीस देण्याचे आमिष देऊन त्या विधीसंघर्ष बालकाच्याजवळ पाठवले. त्याच्या आवडी निवड तपासून त्याला विश्वासात घ्यायला सांगितले. त्या बालकाला पार्टी देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्याने घटनेबाबत माहिती सांगताच  त्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने हत्येवेळी घराच्या बाहेर लक्ष ठेवायची भूमिका निभावल्याचे सांगितले.

महत्त्वाचं म्हणजे, खून झाल्यानंतर विशाल शिंदे नाईक व अर्थव शिंदे नाईक या दोघांना दोन वेळा चौकशी साठी बोलावले होते. परंतु त्यांनी मोठ्या शिताफीने खोटे साक्षीदार उभे केले होते. त्यामुळे पुराव्या अभावी पोलीसांनी त्यांना सोडून दिले होते. मात्र त्याच्यावर संशय असल्याने अथर्व शिंदे याच्यावर पाेलिसांनी पाळत ठेवली. त्यावेळी त्याच्याकडे इन्स्टाग्रामचे चार अकाऊंट असल्याचे समोर आले. त्यातील दोन अकाऊंट हाईड केली होते. फेक अकाऊंटवर त्याने सोशल मीडियावर सच्चाई छुपाई गई हे, अफवाह उडाई गई, कहाणी कुछ और थी, सुनाई कुछ और गई ही पोस्ट टाकली होती. त्यावरून पोलीसांचा अधिक संशय बळावला.

Advertisement

MHADA Mumbai Lottery: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! मुंबई म्हाडाकडून 5000 घरांची लॉटरी निघणार, कधी अन् कुठे?

गुन्हा घडल्याच्या दोन महिन्यांनंतर अर्थव हा राजस्थान येथे जोधपुर येथे बहिण कडे गेला. त्याठिकाणी तो सोन्याच्या अटणीच्या दुकानात काम करत होता.  पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर मी विशालच्या सांगण्यावरून खुनाची कबुली दिली. तसेच तपास चुकीच्या दिशेने जावा यासाठी घरातील टीव्ही व अन्य साहित्य नेऊन नदीपात्राजवळ टाकल्याचे सांगितले. त्याचबरोबर विशाल शिंदे यानेच ११२ ला फोन करून घटना कळवले असल्याचेही सांगितले. 

पोलिसांनी खून झालेल्या परिसरातील मोबाईल टॉवरच्या रेंजमध्ये असणाऱ्या १२०० लोकांचे लोकेशन तपासून त्यांची चौकशी करण्यात केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून देखील ३०० च्या आसपास लोकांना पोलीस ठाण्यात बोलवून चौकशी करण्यात आली होती.  यातून सपोफौ कदम व पोहेकॉ सुरज हेंबाडे यांनी वरील लोकांचे नबंर फिल्टर करून २०० ची तपासणी सुरु केली. त्यानंतर त्यांना धागादोरे हाती लागले आणि सर्व आरोपींना अटक करण्यात आली. 

Advertisement