आधी प्रेमात पडले, नंतर काही वर्ष रिलेशनशिपमध्ये ही होते. तिन महिन्या पुर्वी त्यांनी ब्रेकअप केलं. त्यानंतर त्या सनकी प्रियकराने जे काही केलं त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत. सर्वांनाच विचार करायला लावणारी ही घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. इथं एका माथेफिरू तरूणाने आपल्याच एक्स गर्लफ्रेंडची हत्या केली. शिवाय स्वत: आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. संबध तुटल्यानंतरही त्याने ही कृती केली. त्या मागचे कारण जाणून घेतल्यानंतर तुम्हीही आवाक झाल्या शिवाय राहाणार नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवीन पनवेलमध्ये जागृती सतवे ही तरुणी राहते. तिचे आणि निकेश शिंदे याचे प्रेमसंबंध होते. निकेश हा 22 वर्षाचा आहे. जागृती आणि निकेश हे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर येत आहे. मात्र तिन महिन्या पुर्वी या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर हे दोघे ही वेगळे झाले होते. त्यांच्या कुठलाही संबंध नव्हात. पण जागृतीच्या प्रत्येक हालचालीवर निकेशचे मात्र लक्ष होते. जागृती सर्व काही विसरून गेली होती. तिने आपला नवा मार्ग निवडला होता. त्यानुसार तिने नवी सुरूवात ही केली होती.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
त्याच वेळी जागृती एका मुला बरोबर बोलत असताना निकेशने पाहीले. त्यामुळे तिचे दुसऱ्या मुला बरोबर प्रेम संबंध जुळल्याचा संशय त्याला आला. त्याने कुठलीही शहानिशा केली नाही. या संशयामुळे त्याला राग अनावर झाला. तो तिचे अन्य कुणा बरोबर तरी प्रेम संबंध आहेत हे सहन करु शकला नाही. शेवटी त्या रागाच्या भरातच जाब विचारण्यासाठी तो जागृतीच्या घरी धडकला. तिथे त्याने तिला शिवागाळ केली. नंतर तिला मारहाण ही केले. याने त्याचे मन भरलं नाही.
म्हणून की काय त्याने त्याच्या जवळचा असलेला चाकू बाहेर काढला. त्या चाकूने त्याने जागृतीच्या गळ्यावर सपासप वार केले. वार इतके जबरदस्त होते की जागृती तिथेच खाली कोसळली. तिचा जागेवरच मृत्यू झाला. ती मेल्यानंतर निकेशने हे स्वत:वर ही वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हत्येनंतर खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा निकेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.