परभणी पुन्हा हादरलं! सुर्यवंशी तुरुंगात दगावला, त्यानंतर आणखी एका आंबेडकरी चळवळीच्या आंदोलकाचा मृत्यू

विजय वाकोडे यांच्या निधनानंतर परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
परभणी:

परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेनंतर मोठा हिंसाचार उफाळला होता. यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर परभणीतून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील मुख्य चेहरा अशी ओळख असलेल्या विजय वाकोडे यांचं निधन झालं आहे. 

नक्की वाचा - परभणी हिंसाचार प्रकरणातील आरोपीचा कोठडीत मृत्यू? पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्यासह अनेक नेते जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने विजय वाकोडे यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  

दलित चळवळीत विजय वाकोडे यांची राज्य पातळीवर एक वेगळी ओळख होती. त्यामुळे परभणीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विजय वाकोडे यांनी अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत परभणीतील हिंसाचारानंतर आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर आज अचानक प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळीकडे दुःखाचं वातावरण पसरलं आहे.