मुलाला Online Game चा नाद, कर्जबाजारी झालेल्या आई-वडिलांनी उचलले भयंकर पाऊल

यू महेश्वर रेड्डी (45 वर्षे) यांनी त्यांच्या पत्नीसह जीवन संपवले. नांद्याला जिल्ह्यातील अब्दुल्लापुरममध्ये मंगळवारी रात्री त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये आत्महत्या केली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

समस्त देशाला हादरवणारी एक घटना आंध्र प्रदेशातील नांद्याला जिल्ह्यात घडली आहे. एका दाम्पत्याच्या 22 वर्षांच्या मुलाने कर्जाचा अजस्त्र डोंगर आईवडिलांच्या डोक्यावर तयार करून ठेवला होता. सर्व प्रयत्न करूनही हे कर्ज फेडू शकत नसल्याने या दाम्पत्याने आत्महत्या केली. यू महेश्वर रेड्डी (45 वर्षे) यांनी त्यांच्या पत्नीसह जीवन संपवले. नांद्याला जिल्ह्यातील अब्दुल्लापुरममध्ये मंगळवारी रात्री त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये आत्महत्या केली. 

आत्मकुरू उपविभागीय पोलीस अदिकारी आर.रमणजी नाईक यांनी सदर घटनेबाबत माहिती देताना सांगितले की या दाम्पत्याने कोल्डड्रींकमध्ये विष मिसळलं आणि ते पिऊन आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी सांगितले की महेश्वर रेड्डी यांनी 2 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी आपली 5 एकर जमीन विकली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी स्थानिक न्यायालयात झालेल्या तह आणि सामंजस्य कराराअंतर्गत आपल्या राहत्या घरासह इतर संपत्ती विकून विकली होती. मात्र तरीही पूर्णपणे कर्ज न फिटल्यानंतर कर्जदार त्यांच्यामागे परतफेडीसाठी तगादा लावत होते. राहतं घरही गमावल्यानंतर हे दाम्पत्य त्यांच्या नातेवाईकांकडे राहात होतं. ज्याच्यामुळे या दाम्पत्यावर ही परिस्थिती ओढावली तो मुलगा हैदराबादमध्ये राहातो. 

Advertisement

Blue Whale च्या टास्कपायी लहानग्याने गमावला जीव

बंदी घालण्यात आलेला ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा टास्क पूर्ण करण्यापायी पुण्यातील एका 15 वर्षांच्या मुलाने जुलै महिन्यात आत्महत्या केली होती. 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलाने जीव दिला. तो गेल्या सहा महिन्यांपासून या खेळाच्या विळख्यात अडकला होता. धक्कादायक म्हणजे त्यानं स्वत:च त्याच्या मृत्यूची सविस्तर योजना बनवली होती, अशी माहिती देखील आता उघड झाली आहे. या मुलाच्या आत्महत्येमुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला होता.ब्लू व्हेल गेममुळे एखाद्यानं जीव देण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी असा घटना भारतासह जगाच्या विविध भागांमध्ये घडलेल्या आहेत. आनंद, मनोरंजन आणि शारीरिक तसंच मानसिक विकास होणे हा खेळाचा उद्देश असतो. ऑनलाईन गेम अशी ओळख असलेला 'ब्लू व्हेल गेम' याला मोठा अपवाद आहे. या खेळाच्या नादाला एखादा अडकला की त्याचं सारं आयुष्यच बदलतं. त्याची सुटका होणं अवघड असतं.या गेमच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीला त्याला स्वत:चा, कुटुंबीयांचा, जगाचा विसर पडतो. त्याच्या सर्व आयुष्याचा हा गेम ताबा घेतो. आणि दुर्दैवानं स्वत:चा जीव घेणे हा खेळातून बाहेर पडण्याचा अखेरचा मार्ग उरतो.
 

Advertisement
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )