Akola News : अकोल्यात महावितरणच्या पथकावर प्राणघातक हल्ला, वाहनांवर केली दगडफेक, 'या' परिसरात तणावाचं वातावरण

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कातखेड गावात महावितरणाच्या पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना आज दुपारी घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Mahavitran Team Attack News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Crime News Today : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कातखेड गावात महावितरणाच्या पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना आज दुपारी घडली.दरम्यान,थकित वीज बिल आणि वीज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या अकोला फाईन स्क्वॉडच्या शासकीय वाहनावर काही व्यक्तींनी अचानक दगडफेक केली.या दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या असून शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गणेश जाधव,राम जाधव आणि श्याम जाधव यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार,बार्शीटाकळीच्या कातखेड येथील गणेश जाधव यांच्या घरी वीज चोरी सुरू असल्याची गुप्त माहिती महावितरणाच्या पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे अकोला फाईन स्क्वॉडचे कर्मचारी त्या ठिकाणी तपासणीसाठी पोहोचले.मात्र कारवाईदरम्यान गणेश जाधव तसेच त्यांचे मुलगे राम जाधव आणि श्याम जाधव यांनी संतप्त होत महावितरणाच्या पथकाला विरोध केला.यावेळी त्यांनी शासकीय वाहनावर दगडफेक करत काचा फोडल्या तसेच पथकातील काही कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

नक्की वाचा >> LPG Gas Jugaad : सिलिंडर संपल्यावरही 'या' गावातील बायका राहतात खुश, भन्नाट जुगाड करून 125 घरात पेटवली गॅस

तिघांविरुद्ध गुन्हा;पोलिसांचा तपास सुरू

या घटनेनंतर महावितरणाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी थेट बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करत आहेत.दरम्यान महावितरणाच्या पथकावर झालेल्या या हल्ल्यामुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.तर दुसरीकडे आरोपी अटक करण्याची प्रक्रिया आहे पोलिसांची सुरू आहे.

नक्की वाचा >> '9 वी पर्यंत शिकवलं, 10 वीत शिकवू शकत नाही', मुख्याध्यापिका पालकांवर भडकल्या, ठाण्यातील शाळेचा व्हिडीओ व्हायरल