Dharashiv Crime : धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधी या प्रियकराने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मित्रांकडूनही प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करावयास लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडितेने यासंदर्भात ढोली पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेसोबत नेमकं काय घडलं?
आरोपीने आधी पीडितेशी ओळख केली. नंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. शेवटी लग्नाचं आमिष दाखवून प्रियकराने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. तो नराधम इथवर थांबला नाही, तर त्याने पीडित अल्पवयीन मुलीला थेट मित्रांच्या स्वाधीन केलं. यानंतर त्यांनीही मुलीवर जबरदस्तीने सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील एका गावात घडली आहे.
नक्की वाचा - Viral video: मद्यधुंद तरुणींचा भर रस्त्यात धिंगाणा! भाऊ डॉन आहे सांगत उघड धमकी
16 जून रोजी आरोपी प्रियकराने पीडितेला 'आपल्या लग्नाविषयी महत्वाचे बोलायचं आहे म्हणून गाडीवर बसवून एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. त्यानंतर "मी बापाचे ऐकत नाही, पण मित्रांचं ऐकतो. माझ्या मित्रांना देखील शारिरीक संबध ठेवू दे, नाहीतर तुझ्या वडिलांना, चुलत्यांना जिवंत मारुन टाकेन अशी धमकी देत तिघांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केला. गावात कोणाला सांगितलस तर घरच्यांना जिवंत मारुन टाकेन अशी धमकी दिली.
यानंतर घरी आणून सोडलं. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रसंग वडिलांना सांगितला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या आरोपींच्या हातात चाकू अन् तलवारी असलेले फोटो समाज माध्यमांवर आहेत. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.