सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: 'मम्मी मला मरायचंय, मी विष प्यायलो, मी लोकेशन पाठवत आहे, मृतदेह घेऊन जा..' असा काळीज पिळवटून टाकणारा संदेश पाठवत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. संजयकुमार राजपूत असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आयुष्य संपवण्यापूर्वी या तरुणाने कुटुंबियांना ऑडियो तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करत संदेश पाठवल्याचेही समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?
समोर आलेल्या माहितीनुसार, संजयकुमार विनोदकुमार राजपूत (वय 18) हा पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी येथून देहूरोडमध्ये कन्स्ट्रक्शन इमारतीवर कामाला होता. 17 तारखेपासून तो बेपत्ता होता, त्याबाबत देहूरोड पोलीस स्टेशनला तो मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या बेपत्ता तरुणाचा शोध लावला. मात्र पोलिसांच्या हाती त्याचा मृतदेह लागला, या मृतदेहा शेजारी एक विषाची बाटलीही पोलिसांना सापडली.
धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आईला ऑडियो तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवल्याचंही समोर आले आहे. ज्यामध्ये त्याने आयुष्य संपवत असून मला माझ्या बहिणींची काळजी वाटत असल्याचे म्हटले आहे. 'माझ्या आई वडिलांबद्दल मला आदर आहे, तर माझ्या दोन लहान बहिणींची मला खूप काळजी वाटते, त्यांचा सांभाळ नीट करावा, त्यानी शिकून मोठं व्हावे हीच माझी इच्छा, असं संजयकुमार म्हणाला.
(नक्की वाचा- Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा)
दरम्यान, या चिठ्ठीतून आत्महत्यापूर्वी या तरुणाची परीवार बद्दल तळमळ आत्मीयता दिसून आली मात्र त्याने आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.