Crime News: बिल्डरसह नोकराचे हात पाय बांधले, घर लुटलं, पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र दरोड्याने खळबळ

सगळा प्रकार सुरू असतांना चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवली आणि गॅलरीत जाऊन दरवाजा आतून बंद करत, शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हाका मारल्या, आणि हा प्रकार उघडकीस आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला, बंदी/ होस्टेज बनवून 4 ते 5  दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. निगडी प्राधिकरण परिसरात राहणारे प्रसिद्ध ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक चंद्रभान छोटूराम अग्रवाल यांच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे.

Pune News : इंजिनियरिंग टॉपर निघाला चोर! दुसऱ्या मजल्यावरून दुकानात शिरला आणि हात साफ केला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाला, बंदी/होस्टेज बनवून 4 ते 5  दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी आधी नोकरांचे हात पाय बांधून त्यांना एका खोलीत डांबले,त्यानंतर त्यांनी चंद्रभान यांचे देखील हातपाय बांधून लुटमार सुरू केली, मात्र हा सगळा प्रकार सुरू असतांना चंद्रभान यांनी समय सूचकता दाखवली आणि गॅलरीत जाऊन दरवाजा आतून बंद करत, शेजाऱ्यांकडे मदतीसाठी हाका मारल्या, आणि हा प्रकार उघडकीस आला.

हात बांधलेल्या अवस्थेत चंद्रभान अगरवाल जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाका मारत होते तेव्हाची ही दृश्य आपण बघत आहेत. हीच दृष्य बघून परिसरातील  शेकडो नागरिक तरुण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. दरम्यान दरोडेखोर हे हत्यारबंद असल्याचं कळल्याने बऱ्याच वेळा नंतर घटनास्थळी पोलिस देखील आपले हत्यार सज्ज करून पोहचले मात्र तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिस दलाच्या सर्व विभागाची तपास पथके तत्काळ दाखल झाल्याचा दावा करत, पोलीस उपआयुक्त शिवाजी पवार यांनी घटने संदर्भातील  एकूणच माहिती दिलीय, त्याच बरोबर आरोपींना लवकरच अटक केली जाईल असं देखील ते म्हणाले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Beed News : एक छोटी चूक अन् दोन दिवस डांबून ठेवत अमानूष मारहाण; तरुणाचा मृत्यू)