Crime News: फ्लॅटचा वाद विकोपाला, पतीने पत्नीला संपवलं, पुण्यातील खळबळजनक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यावरून या पती - पत्नी रोज वाद होत होते, त्यांच्या घरात आर्थिक अडचण होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे,  पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन परिसरात पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. मनिषा प्रकाश जाधव अस हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. फ्लॅट घेण्याच्या वादातून हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. 

Pune News : पुणे हादरलं! तरुणीवर घरात घुसून अत्याचार, कुरिअर बॉयची 'परत येईन' अशी धमकी

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन परिसरात पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केलीय, मनिषा प्रकाश जाधव अस हत्या करण्यात आलेल्या पत्नीच नाव आहे. या प्रकरणी बावधन पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी पती प्रकाश जाधव याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यावरून या पती - पत्नी रोज वाद होत होते, त्यांच्या घरात आर्थिक अडचण होती.

(नक्की वाचा-  Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)

पती प्रकाश जाधव हे स्कूल बस ड्रायव्हर असून काही दिवसांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती, त्यानंतर ते उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होते. मंगळवारी पुन्हा त्यांच्यात वाद झाला, त्यातूनच पतीने तिची हत्या केल्याचं म्हटलं आहे. काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आल्यावर रुग्णवाहिका आणण्याच्या बहाण्याने वडील घरातून बाहेर पडले ते परत न आल्याने मुलाने हत्या झाल्याची फिर्याद बावधन पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी पती सोलापूरच्या दिशेने फरार होत असताना त्याला अटक केलीय. याबाबत अधिक तपास बावधन पोलीस करत आहेत

Topics mentioned in this article