जाहिरातीवर एक क्लिक आणि पिंपरी-चिंचवडच्या महिलेचे 90 लाख रुपये गायब!

Pimpri-Chinchwad Fraud: पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेला जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तब्बल 90 लाखांचा फटका बसला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
पिंपरी-चिंचवड:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri-Chinchwad Fraud: इंटरनेट ही आता चैन नाही तर गरज बनलीय. आपण रोज अनेक कामं इंटरनेटच्या माध्यमातून करतो. इंटरनेट सर्फिंगवर लोकांचा वेळ वाढू लागला तसं त्या क्षेत्राकडं जाहिरातदारांचही लक्ष वेधलं. अनेक उपयोगी तसंच फसव्या जाहिरातीही इंटरनेटवर असतात.

या फसव्या जाहिरातींचा फटका बसलेले अनेक जण आहेत. पिंपरी चिंडवडमध्येही अशीच एक घटना घडलीय. पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेला जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तब्बल 90 लाखांचा फटका बसला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंडवडमधील वल्लभनगर परिसरातील  47 वर्षांच्या महिलेच्या बाबतीमध्ये 17 जून ते 7 ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला.  या महिलेनं गूगल वर जाहिरातीची लिंक ओपन केल्यावर तिच्या मोबाईलवर एक मोबाईल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. त्या व्यक्तीनं शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करुन विक्री करुन नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं.

( नक्की वाचा : IPS Bhagyashree Navtake पुणे पोलिसांमध्ये खळबळ! आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल )
 

या महिलेनं त्या आमिषाला बळी पडून तब्बल 90 लाख 27 हजारांची गुंतवणुक केली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पिंपरी पोलिस ठाण्यात राहुल कपूर, ऋत्विक एंटरप्राइजेस, सेल्फी एंटरप्राइजेस, बंगाल प्लास्टिक, वैष्णवी कॉमन सर्विस सेंटर, मधूसुदन क्रेन वर्क, कॉन सर्विस सेंटर, बिस्मिल्ला मटन शॉप आणि आरमार प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य मोबाईल क्रमांक धारक यांच्यावर भा.द.वी. 406, 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा 66 सी आणि डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article