Shocking news: लाईक्सच्या हव्यासात सीमा ओलांडली! पोलिसांनी ‘रीलस्टार’ला लायकी दाखवली

हे लक्षात आल्यानंतर त्याला चांगलाच इंगा पोलीसांनी दाखवला आहे. त्या तरुणा विरोधात कारवाई ही करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वसई:

मनोज सातवी

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्सस्टार सध्या वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवतात. काही करून जास्तीत जास्त लाईक्स आणि व्ह्यूज कसे मिळतील असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते काही ही करत असतात. याच नादात त्यांच्याकडून अक्षम्य चूका ही होतात. त्याचा फटका मात्र सर्व सामान्यांना ही बसतो. अशी एक घटना नालासोपारा इथं घडली आहे. इथं एका रिल स्टारने चक्क दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी रिल तयार केली होती. पोलीसांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला चांगलाच इंगा पोलीसांनी दाखवला आहे. त्या तरुणा विरोधात कारवाई ही करण्यात आली आहे. 

नालासोपारा पूर्वेतील आंबावाडी परिसरात एक 24 वर्षाचा तरूण राहतो. तो रिल बनवतो. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात त्याने भयंकर कृत्य केले. त्याने दोन समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. प्रभोभक टिपण्णी ही केली. हा व्हिडीओ त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून व्हायरल ही केला. जेव्हा ही रिल व्हायरल झाली त्यावेळी लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. या प्रकरणी दलित समाजातील नागरिकांनी आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: मासे महागले! पापलेट, सुरमई, रावस, हलव्याचे दर पाहून डोळे फिरतील, पाहा दरपत्रक

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आचोळे पोलीसही अॅक्शन मोडवर आले. त्यांनी तातडीने संबंधित तरुणाचा शोध सुरू केला. त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कायद्याचा चांगलाच इंगा दाखवला. ‘व्हायरल' होऊन प्रसिद्धीच्या नादात केलेल्या कृत्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली. विशेष म्हणजे reel बनवणारा हा तरुण मुस्लिम असल्याचे दाखवत होता. मात्र प्रत्यक्षात त्याचे नाव गणेश झा असे असून तो गैर मुस्लिम आहे. प्रसिद्धी मिळावी यासाठी त्याने हे कृत्य केले होते. मुस्लीम असल्याचं भासवत त्याने दलित समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.  

नक्की वाचा - Expressway News:मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आता 10 पदरी होणार, पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात, टोल ही आता..

दरम्यान, "काही लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल" असा स्पष्ट इशारा आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजित कुमार पवार यांनी दिला आहे. या तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई ही केली जात आहे. शिवाय अशी घटना परत होवू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे. त्याच बरोबर जनजागृती ही केली जात आहे. जेणे करून असे प्रकार पुन्हा होवू नयेत.