सोशल मीडियाचा वापर करून शिर्डीत सुरु होता घाणेरडा प्रकार, नको ते करताना 4 मुलींना रंगेहाथ पकडलं, पाहा Video

Shirdi Video :  साईबाबांचं समाधी स्थळ आणि भव्यदिव्य मंदिर असलेल्या शिर्डीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shirdi Viral Video

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi Video Viral :  साईबाबांचं समाधी स्थळ आणि भव्यदिव्य मंदिर असलेल्या शिर्डीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बावन बंगले परिसरात देहव्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बावन बंगले परिसरातील हॉटेल पवनधाम या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. या संतापजनक घटनेमुळं शिर्डीतील संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकाची चौकशी सुरु असून  पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा सुरु होता. इंटरनेटचा वापर करून  ग्राहकांशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर ग्राहकांना मुलींचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले जात होते. त्यानंतर या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु केला जायचा. या गंभीर घटनेची खबर मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून धडक कारवाई केली. 

Advertisement

नक्की वाचा >> अकोल्यात खळबळ! तहसील कार्यालयात मोठा राडा, महसूल अधिकाऱ्यावर हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी..

शिर्डी साईबाबांचं समाधी स्थळ असून साईभक्त लाखोंच्या संख्येत दर्शनासाठी इथे येतात. साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. जगभरातून साईभक्त शिर्डीला भेट देतात. शिर्डी ही एक पवित्र भूमि मानली जाते. परंतु, वेश्या व्यवसायासारखा भयंकर प्रकार या ठिकाणी उघडकीस आल्याने येथील नागरिकांसह भाविकांना मोठा धक्का बसला आहे, पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.