Pune News: इंदापुरातून पोलीस हवालदार बेपत्ता, चिठ्ठीमध्ये गंभीर आरोप, पोलीस दलात खळबळ

तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं यामध्ये लिहिलेलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत.केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. या प्रकाराने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत. गायब होण्याआधी त्यांनी एक चिठ्ठीही लिहीली असून मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं यामध्ये लिहिलेलं आहे. 

Advertisement

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.  या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे.

नक्की वाचा - WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा

खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा ही दिला आहे.या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून केमदारने नेमके बेपत्ता का झाले? त्यांच्या बेपत्ता होण्यामागे इतर काही कारण आहेत का ? खरंच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती का ? आणि कशासाठी दिली असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, केमदारणे इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते मात्र 27 एप्रिल रोजी त्यांचा इंदापूर पोलीस ठाण्याकडून मुक्त केले होते, भिगवण पोलीस ठाण्याकडे त्यांना रुजू होण्यासाठी कळवण्यात आलं होतं. मात्र केमदारणे हे भिगवण पोलीस ठाण्यात हजर झाले नव्हते.


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world