गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक, 12 माओवाद्यांना कंठस्नान

पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते.

Advertisement
Read Time: 2 mins
गडचिरोली:

गडचिरोलीत पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे. त्यांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. जेव्हा ही कारवाई झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. तर एक जवानही जखमी झाला आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलवाद्यां विरोधात एक धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाई केली जात आहे. नक्षलवाद्यांबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला गेला. त्यानंतर पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार फायरिंग झाली. त्यात 12 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलिसांचे हे मोठे यश मानले जाते. C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांनी ही संयुक्त पणे कारवाई केली. 

ट्रेंडिंग बातमी -  जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण

जेव्हा ही कारवाई केली गेली त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर होते. शिवाय त्यांच्या बरोबर अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंतही होते. त्यांना या कारवाई माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांना कारवाईत सहभागी असणाऱ्या जवांनासाठी 51 लाखाचे बक्षिस जाहीर केले आहे. शिवाय पोलिसांचेही फडणवीस यांनी कौतूक केले. फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. 

Advertisement