Jalgaon News : बिबट्यावरुन एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात जुंपली; नेमकं काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भर दिवसा आढळलेल्या बिबट्याच्या घटनेवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भर दिवसा आढळलेल्या बिबट्याच्या घटनेवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. या प्रकरणावरून माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

बिबट्याला काठीने मारहाण अन् राजकीय वादंग...

बिबट्याला पकडण्याच्या कारवाईदरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी काठीने मारहाण केल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बिबट्याला आधीच बेशुद्धीचं इंजेक्शन दिलेले असताना त्याला काठीने मारणे हे नियमबाह्य असून गुन्हा ठरू शकतो असे म्हणत एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. तसेच बिबट्या पूर्ण शुद्धीत असताना त्याला पकडलं असतं तर आमदारांचे कौतुक केलं असतं, मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याची टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Beed News: अंबाजोगाईतील बड्या शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? शाळेच्या कपाटात सापडले साहित्य! 15 वर्ष...

दरम्यान, बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी काठीचा वापर करावा लागल्याचे स्पष्टीकरण आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले असून कौतुक करण्याचे धाडस एकनाथ खडसे यांच्यात त्यांची विचारसरणी विकृत असल्याचा पलटवार आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केला आहे. खडसे हे ‘पोटदुखीचे राजकारण' करत असल्याचा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे. या सर्व प्रकारामुळे मुक्ताईनगरातील बिबट्या प्रकरण आता वनविभागापुरते मर्यादित न राहता राजकीय रंग घेऊ लागले आहे.

Topics mentioned in this article