प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना UPSC ने दणका दिला आहे. युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. शिवाय त्यांना यापुढच्या काळात सिव्हील सर्विसेस नियमांअंतर्गत परिक्षा देता येणार नाही. त्यांची उमेदवारीही आयोगाने रद्द केली आहे. पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे 30 जुलैपर्यंत पूजा यांना आपले म्हणणे मांडण्याची मुदत UPSC ने दिली होती. पण पूजा यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी पूजा यांच्या विरोधात कारवाईचे पाऊल UPSC ने उचलले आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी UPSC ने एक समिती नेमली होती. या समितीने UPSC पास झालेल्या जवळपास 15 हजार उमेदवारांचा डेटा चेक केला. या तपासात पूजा यांनी आपल्या नावाचा चुकीचा वापर केल्याचे आढळून आले आहे. वेगवेगळी नावे वापरून परिक्षा दिल्या. त्यामुळे त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. UPSC चे नविन चेअरमन आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - पूजा खेडकरला जेल की बेल? कोर्टात काय- काय झालं?
पुजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यानुसार त्यांची चौकशी पोलिसांनाही करायची आहे. त्यासाठी खेडकर या न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी ही गेल्या आहेत. मात्र त्यावर निर्णय अजून झालेला नाही. मात्र त्या निर्णया आधी युपीएससीने मात्र पूजा खेडकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे या पुढील परिक्षा देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर त्यांच्या वरील आरोपांचे स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्याने ही कारवाई झाली.