जाहिरात

पूजा खेडकरला जेल की बेल? कोर्टात काय- काय झालं?

पूजा यांचे नाव बदलण्याचा प्रकार असो की त्यांनी किती वेळा परिक्षा दिल्या आहेत ही गोष्ट असो. याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकीलांबरोबरच युपीएससीच्या वकीलांनीही स्पष्ट केले.

पूजा खेडकरला जेल की बेल? कोर्टात काय- काय झालं?
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे 

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात झाली. पूजा यांच्या वकीलांनी त्यांना अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी जोरदार युक्तीवाद केला. शिवाय त्यांनी कोणती ही फसवणूक केलेली नाही. त्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे योग्य ठरते? शिवाय त्या एक महिला असून त्यांना कसा त्रास दिला जात आहे, याबाबी पूजा यांच्या वकीलांनी कोर्टात मांडल्या. तर पूजा यांचे नाव बदलण्याचा प्रकार असो की त्यांनी किती वेळा परिक्षा दिल्या आहेत ही गोष्ट असो. त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकीलांबरोबरच युपीएससीच्या वकीलांनीही स्पष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमुर्तींनी याचा निकाल उद्या गुरूवारी संध्याकाळी चार वाजता देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना जेल होणार की बेल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )  

पूजा खेडकरांच्या वकीलाचा युक्तीवाद काय? 

पूजा खेडकरांची बाजू न्यायालयात अॅड. माधवन यांनी मांडली. पूजा यांच्या विरोधात जी कलमे लावली आहे त्यानुसार त्यांना अटक होण्याचा धोका आहे. मात्र त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यांच्यावर नाव बदलण्याचा आरोप आहे. मात्र त्यांनी नाव बदलल्याचे गॅझेट काढले आहे. शिवाय त्यांनी खोटे मेडीकल प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हा आरोपही त्यांच्या वकीलांनी फेटाळून लावला. पूजा यांना दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे एका डॉक्टराने दिलेले नाही तर आठ डॉक्टरांनी दिले आहे. शिवाय ते एम्स बोर्डाकडून देण्यात आले आहे. त्याची मुळ प्रतही युपीएससीकडे सादर करण्यात आली आहे. असे असेल तर या फ्रॉड आला कुठून असा प्रश्न त्यांनी कोर्टाला केला. त्यामुळे जी कलमे लावण्यात आली आहेत ती लागू होत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - यशश्री हत्याकांड : आरोपी दाऊद शेखला 7 दिवसांची पोलीस कोठडी

अटकपूर्व जामीन कशासाठी? 

यावेळी त्यांनी एका निकालाचाही संदर्भ दिला. दिव्यांग व्यक्ती ही मागासवर्गीय लोकांच्या समान आहे. त्यामुळे त्यांना समान लाभ मिळण्यास पात्र आहेत. एक गोष्ट मात्र पूजा यांच्या वकीलाने मान्य केली. त्यांनी सांगितले की पूजा यांनी दिलेल्या परिक्षांच्या आकडा चुकीचा दिला आहे. पण त्या वेगवेगळ्या परिक्षा आहेत. त्यात कुठेही नियमांचे उल्लंघन नाही. युपीएससी त्याची चौकशीही करू शकते असं त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना त्यांची चौकशी करायची आहे. मात्र IAS Academy मसुरी, पुणे कमिशनर आणि DOPT यांनीही पूजा यांना नोटीस पाठवली आहे. आपल्याला बचावासाठी संधी मिळाली पाहीजे. शिवाय आपण लैंगिक आत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे आपल्याला त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे असं त्यांनी कोर्टात सांगितला आहे. शिवाय वेगवेगळ्या नोटीसी आल्याने तिथेही चौकशीला जायचे आहे असेही पूजा यांच्या वकीलांनी युक्तीवादा वेळी सांगितले.  

ट्रेंडिंग बातमी - मोठा धक्का; पोलीस भरतीत EWS अंतर्गत मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती  

सरकारी वकीलांचं म्हणणं काय? 

पूजा खेडकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली आहे असे सरकारी वकील अॅड. श्रीवास्तव यांनी सांगितले. पूजा यांनी अशी माहिती लपवली की ज्यामुळे तिला परीक्षेला बसण्यापासून वंचित केले गेले असते. पूजाने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच तिची चौकशीची गरज आहे. त्यामुळे कोठडी द्यावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. पूजा यांना जर अटकपूर्व जामिन दिला तर त्या चौकशीत सहकार्य करू शकत नाही असेही सरकारी वकीलांनी सांगितले. शिवाय पूजा खेडकर यांना पूर्ण माहिती होती की त्यांनी बनावट कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यांनी पूर्ण शुद्धीत आणि भानावर असताना गडबड केली आहे. ⁠यूपीएससीच्या नियमावलीत हे स्पष्ट लिहिलं आहे की जर तुम्ही कागदपत्रे बनावट सादर केली तर तुमची उमेदवारी रद्द होईल तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे गुन्हा दाखल होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण पाहाता त्यांना अटकपूर्व जामीन देवू नये असे त्यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Exclusive : आता उपोषण नाही इलेक्शन! जरांगे पाटलांचं ठरलं, वाचा संपूर्ण प्लॅन  

यूपीएससीचा जोरदार युक्तीवाद 

या प्रकरणी UPSC कडून तक्रार करण्यात आली आहे. त्यात बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यूपीएससीचे वकील ॲड. नरेंद्र कौशिक म्हणाले, फक्त पूजाचे नाव बदलेल गेले नाही तर तिच्या वडिलांचे नावही सातत्याने बदलले आहे. त्यानंतर तिच्या आईचे नावही बदलले गेले आहे. तिला तसं करायचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी केला. पूजा यांनी आईचे नाव तिन वेळा बदलले आहे. मनोरमा बुधवंत, मनोरमा जे. बुधवंत आणि  खेडकर मनोरमा दिलीपराव अशी नावं बदलली आहेत. हे युपीएससीच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले. यामुळे एका प्रामाणिक उमेदवाराची संधी पूजा यांनी हिरावून घेतली आहे.

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंची मराठा आरक्षणावर रोख 'ठोक' भूमिका, कोणाची पंचाईत होणार?

कोर्टाने काय सांगितले? 

पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी पटियाला हाऊस कोर्टात झाली. त्यांच्यावर बनावटगिरी आणि फसवणूक करण्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची गरज आहे. याबाबत पूजा खेडकर यांचे वकील, त्याच बरोबर सरकारी वकील आणि युपीएससीच्या वकीलांनी युक्तीवाद केला. पूजा यांना कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील आणि युपीएससीच्या वकीलांनी केली. तर पूजा खेडकर यांच्या वकीलांनी त्याला विरोध केला. आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहीजे असे त्यांनी सांगत, अटकपूर्व जामीन मंजूर करावा असे कोर्टाला सांगितले. दोन्ही बाजू कोर्टाने ऐकून घेतल्या आहेत. यावर आता उद्या गुरूवारी चार वाजता निकाल देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com