पुणे पोर्शे कार प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात अटकेत असलेला अल्पवयीन तरूणाचा बाप विशाल अगरवाल याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. या बहाद्दराने सर्व नियम धाब्यावर बसवून सरकारी भाडेपट्ट्याच्या जागेत एक पंचतारांकीत हॉटेल थाटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात अनधिकृत बारही चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील विशाल अगरवाल याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. यातून त्याचे महाबळेश्वर कनेक्शन उघड झाले आहे. नियम धाब्यावर बसवुन शासकीय भाडेपट्ट्याच्या जागेत त्याने पंचतारांकीत हॉटेल उभारले आहे. याच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न विचारला जातोय.
हेही वाचा - कर्नाटकात गर्भपात, सांगलीत मृत्यू, 'त्या' प्रकरणात कविता सिस्टरमुळे धक्कादायक बाब उघड
अगरवाल याने यांनी शासकीय मिळकत भाड्याने घेवून त्या ठिकाणी फाईव्हस्टार दर्जाचं हॉटेल बांधलं आहे. सरकारी सर्व नियम धाब्यावर बसवून हे हॉटेल उभारण्यात आले आहे. या हॉटेलबाबत अनेक तक्रारी महाबळेश्वर नगरपालिकेत दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एक बार असून तो अजून ही सुरु असल्याचे सांगण्यात येतय. तसंच स्वत:च्या वापरासाठी दाखवण्यात आलेले हे हॉटेल पुन्हा दुस-यांना भाडेतत्वावर देण्यात आले आहे. शिवाय ज्याने दारू पिऊन दोन जणांचे जीव घेतले त्याचा अनधिकृत बार सुरू कसा असाही प्रश्न आता महाबळेश्वरमधील नागरिक विचारत आहेत. शासनाला फसवून बांधण्यात आलेल्या या अनाधिकृत हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. हॉटेल तात्काळ सिल करुन शासन जमा करण्यात यावं अशी मागणी आता महाबळेश्वर मधून होत आहे.
पुण्यातील कल्याणीनगरात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन तरूण बाल सुधारगृहात आहे. तर त्याचे वडील विशाल अगरवाल हे पोलिस कोठडीत आहेत. शिवाय आजोबा सुरेंद्र अगरवालही पोलिस कोठडीत आहेत.