Psycho Killer : भयंकर! फक्त सौंदर्याच्या हव्यासातून महिलेने संपवली 4 मुले! पोटच्या मुलाचीही हत्या

Psycho Killer : आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या (Jealousy) आणि असुरक्षितता (Insecurity) यातून या महिलेने जे पाऊल उचलले, त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:


Psycho Killer : हरियाणातील एका महिलेने केलेल्या कृत्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या (Jealousy) आणि असुरक्षितता (Insecurity) यातून या महिलेने जे पाऊल उचलले, त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या महिलेने तब्बल चार निष्पाप मुलांची हत्या केली आहे.

काय आहे प्रकरण?

ही भयानक घटना हरियाणातील पानीपत शहरातून समोर आली आहे. पानीपतचे एसपी भूपेंद्र सिंग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपी महिलेची विचारसरणी 'सायको किलर' प्रकारची आहे. या महिलेला सुंदर दिसणाऱ्या लहान मुलींचा तिरस्कार होता आणि भविष्यात कोणतीही मुलगी आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये, या भीतीने तिने ही टोकाची भूमिका घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पूनम नावाच्या या महिलेने सुरुवातीला आपल्या नातेवाईकांमधील आणि कुटुंबातील सुंदर दिसणाऱ्या मुलींना लक्ष्य केले. 2023 मध्ये तिने आपल्या नणंदेच्या मुलीची आणि भाच्याची हत्या केली होती. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे कोणालाही संशय येऊ नये म्हणून, तिने नंतर स्वतःच्या एका लहान मुलालाही मारून टाकले.

( नक्की वाचा : Honey Trap: पाकिस्तानला ब्राह्मोसची गुप्त माहिती देणाऱ्या वैज्ञानिकाच्या शिक्षेत मोठा बदल; काय घडलं कोर्टात? )
 

तिच्या मनात हा विचार पक्का झाला होता की, या मुली मोठ्या झाल्या तर त्या तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतील. याच भीतीपोटी आणि क्रूर ईर्षेपायी तिने या निष्पाप जीवांचा बळी घेतला.

Advertisement

कशी झाली अटक?

आरोपी पूनम नुकतीच 6 वर्षांच्या एका निरागस मुलीच्या हत्येनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पाणीपतच्या सिवाह गावामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये तिने चौथ्या मुलाला ठार मारले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली, तेव्हा एका 6 वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू होणे ही गोष्ट पोलिसांना संशयास्पद वाटली. दुसरे म्हणजे, ज्या खोलीत मुलीचा मृत्यू झाला, त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता.

यावरून स्पष्ट झाले की, त्या मुलीला कोणीतरी आत घेऊन गेले आणि नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी सखोल तपास केला असता, त्यांना पूनमवर संशय आला. ती दिसायला हुशार आणि समजूतदार असली तरी, सुंदर मुलींना बघताच तिचा पारा चढायचा, अशी माहिती एसपींनी दिली.

Advertisement

( नक्की वाचा : Pune Land Scam : पुण्यातील जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक, मोठे खुलासे होणार? )

पूनमने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तिची विचारसरणी अत्यंत विकृत होती. आपण पकडले जाऊ नये किंवा आपल्यावर कोणाला संशय येऊ नये, यासाठी तिने आपल्या दोन मुलांपैकी एकाची हत्या केली. मुलगी  मोठी होऊन आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू नये, केवळ याच एका कारणामुळे तिने या भयानक हत्या केल्या.

अखेरीस पकडली गेल्यानंतर, आता तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत, सोनीपतच्या भावड गावची रहिवासी असलेल्या पूनमने एकूण 4 लहान मुलांची हत्या केली आहे. या घटनेने समाजात एकच खळबळ उडाली असून, तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article