अविनाश पवार, खेड:
Pune Khed News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात जादु- टोणा, अंधश्रद्धेचा खेळ सुरु आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीवेळीही असे प्रकार उघडकीस आले होते. अशीच धक्कादायक घटना पुण्यातील खेड तालुक्यात घडली असून अख्ख्या गावात खळबळ उडाली आहे. जादू टोण्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..
भर दुपारी जादूटोण्याचा प्रकार...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जादुटोणा करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे. बंद घराच्या दारात दही–भात, लिंबू, हळदकुंकू लावून नारळ फोडणारे संशयित कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Nagpur Crime: चुलत भाऊ बहिणीचे प्रेमसंबंध, टोकाचा वाद अन् झोपेतच मर्डर; नागपुरात खळबळ
कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर भर दुपारी एक पुरुष हातात पिशवी घेऊन आला. बंद घराच्या दारासमोर बसून त्या वृद्ध व्यक्तीने दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावले, त्यानंतर नारळही फोडला. त्या पुरुषासोबत एक महिलाही दिसत आहे. हा प्रकार पाहून गावातील लोकही गोळा झाले.
गावकरी भयभीत...!
परिसरातील नागरिकांनी जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला याबाबत विचारलं, तेव्हा त्याने मुंबईहून आलोय असं सांगितले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. गावकऱ्यांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू असून त्यातूनच हा जादूटोणा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गावकरी जमले, गर्दी झाली तरीही या व्यक्तीने न थांबता दारासमोर हळदी- कुंकुं मांडले. या विचित्र कृत्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरली आहे. परिसरातही या प्रकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.