Pooja Khedkar News: वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या वादग्रस्त कारनाम्यांनी राज्यभरात खळबळ उडाली होती. पूजा खेडकरच्या गाडीपासून तिच्या आईच्या दमदाटीपर्यंतचे अनेक किस्से समोर आल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता याच पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. नवी मुंबईच्या रबाळा कुटुंबातून अपहरण झालेला ट्रक क्लिनर खेडकर यांच्या घरात सापडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्वीट करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
Crime News: 'तुला अजून त्रास द्यायचा नाही', आईने मुलासह आयुष्य संपवलं; चिठ्ठीतून हृदयद्रावक खुलासा
नेमकं काय घडलं?
दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार (वय 22) राहणार तुर्भे एमआयडीसी नवी मुंबई हा आपला मिक्सर ट्रक घेऊन जात होते. यावेळी कार क्रमांक एम एच 12आर टी 5000 या कारला मिक्सरचा धक्का लागला. अपघातानंतर सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर, वाद वाढत गेला आणि याच वेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतले आणि त्याला घेऊन पसार झाले.
गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे कारचा मागोवा घेत पुणे येथे गेले असता सदरची कार ही वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या चतुश्रृंगी हद्दीतील घरी मिळून आली. तेथून अपहरण केलेला चालक याची एपीआय खरात व त्यांच्या टीमने सुटका केली. तपास करत असताना पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांशी अरेरवी पणा केला व दरवाजा न खोलताच पोलिसांशी हुज्जत घातलेली आहे. पोलिसांनी त्यांना रबाळे पोलीस स्टेशन येथे येण्याची सूचना केली असून पुढील तपास चालू आहे.