
Mother And Son Death Delhi: ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. येथे एका आई आणि तिच्या मुलाने १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याबाबत लिहले आहे.
ही घटना ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलिस ठाण्यातील आहे. येथील एस सिटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव साक्षी चावला आणि तिच्या मुलाचे नाव दक्ष चावला असे आहे. पोलिसांना महिलेकडून एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिलेने तिच्या पतीची माफी मागितली आहे. असेही लिहिले आहे की आम्ही दोघेही तुम्हाला आणखी तणाव देऊ इच्छित नाही. म्हणूनच आपण हे जग सोडून जात आहोत. आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. फक्त आपणच जबाबदार आहोत.
जादूटोण्याच्या संशयावरून संभाजीनगरात खळबळ; बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर अघोरी कृत्य
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत महिलेचा पती गुरुग्राममध्ये काम करतो. घटनेच्या वेळी तो त्याच्या खोलीत होता. तो सकाळी ९:०० वाजता उठला आणि त्याने पत्नीला मुलीला औषध देण्यास सांगितले आणि नंतर तो खोलीत गेला. यादरम्यान, पत्नीने मुलाला घेतले आणि त्यानंतर तिने उडी मारली. सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
बिसरख पोलीस स्टेशन या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे आणि आत्महत्येमागील कारणे जाणून घेण्यासाठी सुसाईड नोटची बारकाईने तपासणी केली जात आहे. या वेदनादायक घटनेमुळे सोसायटीतील रहिवासी हादरले आहेत आणि या घटनेने पुन्हा एकदा मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
( नक्की वाचा : पोलिसांच्या सायरनचा वापर करून दरोडेखोरांनी रचला कट; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उधळला डाव )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world