Pune News: हृदय सुन्न करणारी घटना! आईसह दोन लेकरांची हत्या, मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न

मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असावे असं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अविनाश पवार 

पुणे ग्रामीणमधून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. शिरुर तालुक्यातील रांजणगाव परिसरात एका महिलेची आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांची अमानुष हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना रांजणगावच्या खंडाळा घाटाजवळील परिसरात घडली आहे. आईसह दोन मुलांचे मृतदेह जंगलात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपींने पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे मृतदेह अर्धवट अवस्थेत जळाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असावे असं सांगितलं जात आहे. तर तिच्या मुलांपैकी एकाचे वय चार वर्षे आणि दुसऱ्याचे वय दीड वर्ष असल्याची प्राथमिक माहिती आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या अमानुष कृत्यामागचे कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहे. तसेच स्थानिकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

ट्रेंडिंग बातमी - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेनं हृदय सुन्न झालं असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना अर्धवट अवस्थेत जळलेले मृतदेह मिळाले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसां समोर आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कृत्य वाढताना दिसत आहेत.