Pune Crime: परदेशी महिला, हॉटेलमध्ये नको ते धंदे... पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Pune News: वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत एका विदेशी नागरिकासह दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरात एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी छापेमारी करतएका विदेशी महिलेसह दोन परराज्यातील महिलांची केली सुटका केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहराच्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या आंतरराज्यीय वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून ग्राहक बनून हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत एका विदेशी नागरिकासह दोन परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Ujjwal Nikam: '...म्हणून मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला जात नाही', उज्ज्वल निकम असं का बोलले

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये हा अनैतिक प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत, गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ या हॉटेलवर पाळत ठेवली. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे योजना आखली. पोलिसांनीच 'बनावट ग्राहक' म्हणून संबंधित हॉटेलमध्ये संपर्क साधला आणि आरोपी आदित्य अनिलकुमार सिंह (अटक आरोपीचे नाव) याच्याशी संवाद साधला.

​ग्राहकाच्या रूपात हॉटेलमध्ये गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याने रॅकेटची खात्री पटताच, बाहेर असलेल्या आपल्या पथकाला इशारा दिला. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेलमध्ये धडक कारवाई केली. यावेळी हॉटेलच्या खोलीतून पोलिसांनी एका विदेशी महिलेसह परराज्यातील दोन महिलांची सुटका केली. 

Advertisement

Kalyan News: भाषा वादात अर्णवचा बळी, पण राजकारण्यांची भलतीच खेळी, वाद चिघळणार?

अटक करण्यात आलेला आरोपी आदित्य सिंह हा परराज्यातील गरीब आणि गरजू मुलींना फसवून त्यांना पुण्यात आणत होता आणि त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेषतः, आरोपी परराज्यातील मुलींना नोकरीचे आमिष दाखवून किंवा इतर खोट्या गोष्टी सांगून पुणे शहरात आणत होता आणि त्यानंतर त्यांना या दलदलीत ढकलत होता.

Topics mentioned in this article