Pune Crime: विमानाने पुण्यात यायचे, ज्येष्ठांना टार्गेट करुन 'असे' लुटायचे, 2 चोरटे गजाआड

Pune News: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे: पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नियाज इजाज मोहम्मद ,सावेज सलीम अली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  उत्तरप्रदेशातून विमानाने पुण्यात येऊन हे दोघेही ज्येष्ठ नागरिकांना लुटायचे. अटकेनंतर या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशातून विमानाने पुण्यात येत  ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एटीएमधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना ते टार्गेट करायचे आणि संधी मिळताच मदतीचा बहाणा करत फसवणूक करायचे. याप्रकरणी एका वृद्ध व्यक्तीने दिलेल्या पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांनाही अटक केली आहे. 

Advertisement

तक्रारदाराच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यातत 9 मे रोजी खडकी बाजार परिसरातील ते एका बँकेच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी नियाज आणि सावेज हे एटीएमच्या बाहेर दबा धरून बसले होते. त्याच वेळी फिर्यादी एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. 

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके

चोरट्यांनी त्यांच्याकडील एटीएम कार्डचा वापर केला. पैसे न मिळाल्याने दोघांनी त्यांना त्यांच्याकडील एटीएम कार्ड दिले. त्यानंतर ज्येष्ठाच्या चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यातून 1 लाख चार हजार 650 रुपये काढून घेतले. या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी हे उत्तर प्रदेशात पुण्यातील नाना पेठ येथील एका लॉजवर मुक्कामी राहायला यायचे आणि पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायचे असे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सुत्रे हलवत त्यांना अटक केली आहे.