जाहिरात

Nilesh Ghaiwal Story: निलेश घायवळ परदेशी कसा पळाला? नावात घोळ, पासपोर्टचा मोठा स्कॅम; सनसनाटी खुलासा

Nilesh Ghaiwal Made Deliberate Mistake For passport: मात्र मकोका लागला असतानाही निलेश घायवळ परदेशात पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nilesh Ghaiwal Story: निलेश घायवळ परदेशी कसा पळाला? नावात  घोळ, पासपोर्टचा मोठा स्कॅम; सनसनाटी खुलासा

समीर सावंत, प्रतिनिधी:

Nilesh Ghaiwal Made Deliberate Mistake in passport Special Story: कोथरुड परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गँगने गोळीबार केला. याप्रकरणात युवक जखमी झाल्यानंतर पोलिसांनी कठोर कारवाई कर त्याला मकोका लावला. मात्र मकोका लागला असतानाही निलेश घायवळ परदेशात पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पासपोर्ट मिळवण्यासाठी निलेश घायवळने मोठा स्कॅम केल्याचाही आरोप आता होत  आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा..

निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला कसा?

पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ (Don Nilesh Ghaiwal Escaped) परदेशात पसार झाला आहे.  मात्र यावरुनच अनेक सवाल निर्माण होत आहेत. डझनभर गुन्हे दाखल असतानाही निलेश घायवळ परदेशात पळाला कसा? गेली वीस वर्ष निलेश घायवळ गुन्हेगारी जगतात सक्रीय आहे. त्यामुळे घायवळला पासपोर्ट मिळालाच कसा हासुद्धा सवालच आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी त्याने चिटिंग केल्याचही समोर आलंय. घायवळ आडनाव सोडून त्याने गायवळ हे आडनाव लावले. तसंच पासपोर्टसाठी पत्ता सांगताना, अहिल्यानगरमधील गौरी घुमट, आनंदी बाजार, माळीवाडा मार्ग असा दिला होता. मात्र अहिल्यानगरच्या पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेनशवर not available असा रिमार्क मारला आहे. 

Pune News: एम. कॉम शिकलेला निलेश घायवाळ कसा बनला कुख्यात गुंड? कशी मिळवली एवढी संपत्ती?

पासपोर्ट देण्यामागचा आका कोण?

निलेश घायवळ हा पुण्यातला (Pune Gangster Nilesh Ghaiwal) मोठा गुंड आहे. त्याच्यावर मकोका लागला आहे. अशा कुख्यात गुन्हेगाराचा पासपोर्ट पोलीस जप्त करतात. मग पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट जप्त का केला नाही? सामान्य माणसाला पासपोर्ट काढताना कागदपत्रांमुळे नाकीनऊ येतात. त्यात पोलीस व्हेरिफिकेशनचा मनस्तापही असतो. अगदी स्पेलिंग मिस्टेक असली तरी अनेकदा पासपोर्ट नाकारले जातात. घायवळने दिलेल्या पत्त्यावर not available असा रिमार्क असूनही, दोन डझन गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट मिळाला कसा? मग त्याला पासपोर्ट कसा मिळाला? कोणी मदत केली? राजकीय हस्तक्षेप झाला की, पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून मदत झाली? का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

पासपोर्टसाठी मोठा झोल!

त्याचबरोबर निलेश घायवळवर हत्या, खंडणी तसंच मकोकासारखा गंभीर गुन्हा आहे. असे असताना  पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट जप्त का केला नाही? असा सवाल करतपासपोर्टसाठी चिटिंग करत घायवळचं नाव गायवळ केल्याचाही आरोप होत आहे. त्याने दिलेल्या  पत्त्यावर NOT AVAILABLE असा रिमार्क असूनही पासपोर्ट कसा मिळाला?पासपोर्ट देण्यासाठी घायवळला कुणी मदत केली? राजकीय हस्तक्षेप की पुणे प्रादेशिक पासपोर्ट ऑफिसमधून मदत? अशा प्रश्नांची उत्तरे आता शोधावी लागणार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com