पुणे: हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल असलेला प्रफुल लोढा याचे काळे कारनामे आता समोर येत आहेत. प्रफूल लोढा याच्याविरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोढा याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 'हनी ट्रॅप' सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
याआधी 62 वर्षीय लोढावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात 'पोक्सो' सह बलात्कार आणि 'हनी ट्रॅप'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा याच्यावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे.
दरम्यान, राजकीय नेत्यांवरील गंभीर आरोपांमुळे प्रफुल लोढा चर्चेत होते. 2024 मध्ये लोढांना 'वंचित'कडून उमेदवारी मिळाली होती. मात्र 5 दिवसातच लोढा याने उमेदवारीतून माघार घेतली. सध्या मुंबई पोलिसांकडून जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. लोढा यांचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.
Thane News: ठाणे पोलिसांची मोठी कारवाई, शहर परिसरात 30.26 कोटीचे अमली पदार्थ जप्त