Siya Goyal Case: सिया गोयल अन् 'क्रॉस मॅरेज'! प्रकरणात ट्वीस्ट, कुटुंबीयांनी ही दिला दुजोरा, आता कोण अडकणार?

हे सर्व होत असताना सियाच्या डोक्यात काही तरी दुसरं सुरू आहे याची कल्पना तिच्या भावाला नव्हती असं ही समोर आलं आहे

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस सखोल चौकशी करत असून कोणताही मुद्दा उरू नये यासाठी प्रयत्नशील आहेत
  • सिया आणि केतन यांचं लग्न ठरलेलं असून सियाचा भाऊ साहिल याचं लग्न केतनच्या बहीणी सोबत होणार होतं
  • दोन्ही कुटुंबांनी आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी क्रॉस मॅरेजचे प्रस्ताव मान्य केले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलीस कसून चौकशी करत आहेत. या केसमध्ये कोणताही छेद राहू नये यासाठी पोलीसांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधीत अनेक गोष्टी खोदून खोदून काढल्या जात आहेत. सिया आणि केतन या दोघांची ही कुटुंब मोठी आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. त्यात आता पोलीसांच्या हाती एक नवा अँगल आला आहे. हा नवा अँगल म्हणजे सियाच्या क्रॉस मॅरेजचा आहे. पहिलांदाच पोलीसांनी ही या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून तरी काही हाती लागतं का याकडे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.   
 
पुणे पोलीसांनी आता क्रॉस मेरेज अँगलवर लक्ष दिले आहे. क्रॉस मॅरेज म्हणजे सियाचे लग्न हे केतन अग्रवाल सोबत ठरले होते. त्याच वेळी सियाचा भाऊ साहिल याचं लग्न केतनच्या बहीणी सोबत ठरल्याचंही समोर आलं आहे. गोयल आणि अग्रवाल कुटुंबाचे नाते हे अनेक वर्षापासूनचे आहे. हे नाते आणखी घट्ट व्हावे या उद्देशने दोन्ही कुटुंबानी क्रॉस मॅरेजचे प्रपोजल ठेवले होते. त्याला मान्यता ही देण्यात आली होती. त्यानुसार आधी केतन आणि सियाचे लग्न ठरले होते. त्यानंतर सियाचा भाऊ साहिलचे लग्न होणार होते.  

नक्की वाचा - Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...

Advertisement

या सर्व चर्चा सुरू असताना सिया आणि केतनच्या प्री वेडिंगचा विषय निघाला होता. त्यात प्री वेडिंग बाली इथं करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी 6 जून हा दिवस ही ठरला होता. विशेष म्हणजे याच प्री वेडिंगला सिया- केतन सोबत सियाचा भाऊ साहिल आणि केतनची बहीण ही जाणार होते. त्यांची तिकीट ही बूक झाली होती. नोव्हेंबरमध्ये सिया केतन यांचं लग्न लागणार होतं. त्या लग्नानंतर साहिल आणि केतनच्या बहीणीच्या लग्नाचा मुहुर्त काढला जाणार होता. त्यामुळे सियाचा भाऊ साहिल ही या लग्नापासून खूष होता. शिवाय केतनच्या बहीणीचा ही या लग्नाला होकार होता. 

नक्की वाचा - Siya Goyal: लोहगडावर जाण्याचा आग्रह सियाचा नव्हताच, तो आग्रह तर... केतन हत्या प्रकरणाला वेगळं वळण

हे सर्व होत असताना सियाच्या डोक्यात काही तरी दुसरं सुरू आहे याची कल्पना तिच्या भावाला नव्हती असं ही समोर आलं आहे. किंवा  लग्नासाठी ती नाराज आहे हे तिने आपल्या होणाऱ्या वहीनीला ही सांगितलं नव्हतं. शिवाय चेतन हा फक्त सियाचा मित्र आहे असं साहिल आता सांगत आहे. त्यांच्यात काही तरी होतं हे तो मान्य करण्यास तयार नाही. क्रॉस मॅरेज मुळे दोन्ही कुटुंबं खुश होती ही बाब ही आता समोर आली आहे. कुटुंबांनी ही त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे त्यावेळी तरी सिया या लग्नासाठी तयार होती. ती खूष असल्याचं दाखवत होती. मग अशा स्थिती नक्की काय झालं ज्यातून केतनचा जीव गेला हे पोलीस आता शोधत आहेत.