देवा राखुंडे
कॉलेजमधल्या प्रेम प्रकरणातून दोन तरुणांवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये घडला आहे. पुण्यात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवसात कुठे ना कुठे हत्या,आत्महत्या, बलात्कार, चोऱ्या, दरोडे याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे त्यात अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आढळून आला आहे. त्यात आता इंदापूरात प्रेम प्रकरणातून जीव घेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॉलेज मधील प्रेमसंबंधाच्या कारणावरुन दोन मुलांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.इंदापूर तालुक्यातील भवानीनगर गावात भवानी माता मंदिराच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. संचित घोळवे आणि सुजल जाधव अशी जखमींची नावे आहेत. यापैकी सुजल जाधव याच्या डोक्यामध्ये जबर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत.
हा हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. लोकांची धावपळ झाली. त्यानंतर पोलीसही तातडीने हरकतीत आले. त्यानंतर पुढच्या केवळ दोन तासातच वालचंदनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतल आहे.अदनान महंमद शेख,पियुष प्रथम चव्हाण आणि यशराज गणेश अरवडे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे तिघेही इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील आहेत. यासोबत या गुन्ह्यात इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: चिकनची पार्टी जीवावर बेतली, खारघरमध्ये भयंकर घडलं
वालचंदनगर पोलिसांनी या आरोपींनी भवानीनगर मधील ज्या बाजारपेठेत हा हल्ला केला, त्याच बाजारपेठेतून त्यांची धिंड देखील काढली आहे. हल्ला करणारी मुले ही बारामती वरुन पुणेच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्यांचा सिने स्टाईलने पाठलाग केला. त्यानंतर सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टाफ व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्याबाबत अधिक तपास केला जात आहे.