रेवती हिंगवे
पुणे शहरात सध्या गुईलेन बॅरी सिंड्रोम (GBS) चे रूग्ण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या पुणे शहरात 130 GBS चे रुग्ण आहेत. त्यातील 20 रुग्ण हे वेंटीलेटर सपोर्टवर आहेत. तर अनेक जण पुण्यातील वेग वेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरीकडे पुणे शहरात 3 GBS रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आज अजून एका GBS रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यातील GBS मुळे मृत्यू झाल्याची संख्या 4 वर गेली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती. प्रामुख्याने पुणे शहरातल्या धायरी गाव, किरकटवाडी, नांदेड सिटी परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातले पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. प्राथमिक अहवालानुसार रेसिडुअल क्लोरिनचे प्रमाण हे बरोबर होते. पण त्यातच काही नमुन्यांमध्ये कँपिलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोवायरस हे जीवाणू आणि विषाणू आढळून आले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Crime News: चिकनची पार्टी जीवावर बेतली, खारघरमध्ये भयंकर घडलं
अजून एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये टँकर मार्फत परिसरांमध्ये पाणी पुरवले जाते. त्या पाण्याचा नमुन्यांचा अहवाल समोर आला आहे. या अहवाल स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे की कोलीफॉर्म आणि ई कोलाय हा जीवाणू टँकर मार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात अढळला आहे. ते पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे पुणेकरांना दूषित पाणी पुरवलं जात आहे, हे यातून तर स्पष्ट झालं आहे.
दूषीत पाणी पुरवठा होत असल्याने प्रश्न असा उपस्थित होतो, की टँकर मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणत पाणी पुरवले जाते तर त्याची योग्य ती चाचणी आणि तपासणी कोण करतं? टँकर मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी का पुरवलं जातं? आता पुणेकरांनी या सगळ्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे मागायचे? अशी विचारणा होत आहे. एकीकडे पुणे महानगरपालिका लोकांना आव्हान करत आहे, पिण्याचे पाणी उकळून प्या, तर दुसरीकडे ‘टँकर माफियाचा' हा भोंगळ कारभार चालू आहे. याला जबाबदार कोण अशी विचारणा पुणेकर करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world