Pune News : दौंडहून पुण्याला जाणाऱ्या शटल डेमू ट्रेनमध्ये आग, बोगीत धुराचे प्रचंड लोट; प्रवाशांचा मदतीसाठी धावा

ही रेल्वे दररोज दौंडमधून सात वाजून पाच मिनिटांनी धावते. आज सकाळी निघालेल्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

दौंडहून पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या शटल डेमू ट्रेनला आग लागल्याची घटना घडली आहे. ही रेल्वे दररोज दौंडमधून सात वाजून पाच मिनिटांनी धावते. आज सकाळी निघालेल्या ट्रेनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. डेमू रेल्वेच्या या डब्यामध्ये आगीमुळे धुराचे लोट पसरले आहेत.

प्रवाशांमध्ये सध्या भीतीच वातावरण पसरलं आहे. आगीची घटना घडताच प्रवासी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करू लागला. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

दरम्यान या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये बोगीमध्ये धूराचे लोट दिसत आहेत. प्रवाशांनी तोंडावर रुमाल ठेवला आहे. बोगीमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अचानक आगीच्या घटनामुळे प्रवासी आरडाओरडा करीत असून मदतीची मागणी करीत असल्याचं दिसत आहे. 

बातमी अपडेट होत आहे, 

Topics mentioned in this article