पुण्यामध्ये एका मद्यधुंद बीएमडब्लू चालकाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. त्याच्या तिव्र प्रतिक्रीया पुण्यात उमटली. सगळ्या स्तरातून यावर टिका करण्यात आली. त्यानंतर हा रईसजादा कोण याची चर्चा पुण्यात सुरू झाली. पोलीसही त्याला शोधू लागले. त्यानंतर हा गौरव अहुजा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो गायब झाला होता. त्यानंतर त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बड्या बापाचा लेक अशी या गौरव आहुजा याची ओळख आहे. त्याच्या वडीलां विरुद्धही काही गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या कृत्यानंतर पुण्यात प्रतिक्रीया उमटल्यानंतर त्याच्या वडीलांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. त्यानंतर आता या गौरवचा ही व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तो माफी मागताना दिसत आहे. तो म्हणतोय मी गौरव आहुजा, माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो. मला एक चान्स द्या, सॉरी. माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. पुढच्या आठ तासात मी येरवडा पोलीस ठाण्यात सरेंडर होईल,” असं म्हणत त्याने माफी मागितल्याचा व्हिडीओ तयार केला आहे. तो ही सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान गौरव आहुजा आणि मनोज आहुजा यांच्याबाबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा दावा केला आहे. गौरव आहुजा हा पहिल्यांदाच गुन्हेगार नाही, तो एक सवयीचा गुन्हेगार आहे. ज्याला गुन्ह्यांचा दीर्घ इतिहास आहे. त्याला कायदा माहित आहे. कायदेशीर पळवाटा कशा शोधायच्या आणि अटक कशी टाळायची हे त्याला माहित आहे. त्याचा मागील रेकॉर्ड घाणेरडा आहे, असे कुंभार यांनी म्हटले आहे. तसेच गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा दोघांवरही क्रिकेट सट्टेबाजी, खंडणी आणि तुरुंगवास अशा अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
गौरव आणि गाडीतील त्याचा मित्र दोघेही मद्यधुंदावस्थेत होते. सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवर अश्लीलपणा एकानं मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता. धक्कादायक बाब म्हणजे लोकांनी हटकल्यानंतरही या तरुणाने उर्मटपणा केला. त्यानंतर फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने त्याने पळ काढला. त्याचे ही कृती त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर त्याचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर काही वेळातच या आहुजाची नशा उतरली.