रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील विवाहित महिलेला घरी बसून राहणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले आहे. या महिलेनं नवऱ्याकडं नोकरी शोधण्याचा आग्रह केला होता. या प्रकरणावरुन तिचे आणि सासरच्या मंडळींचे वाद होत असतं. त्यानंतर सासरच्या मंडळीकडून महिलेचा छळ सुरु झाला. या छळाला कंटाळून अखेर विवाहित महिलेनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे.
काय आहे प्रकरण?
सीमा अक्षय राखपसरे (वय 24, रा. चंदवाडी, स्मशानभूमीजवळ, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल रवी हिरामण खलसे (वय 50, रा. फुलेनगर, पंचवटी, नाशिक) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे वसंत राखपसरे, सासु आशाबाई सुरेश राखपसरे, दीर अविनाश सुरेश राखपसरे, जाऊ पुला अविनाश राखपसरे (सर्व रा. फुरसुंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरात 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा हिचा अक्षय राखपसरे याच्याबरोबर 6 जुलै 2020 रोजी विवाह झाला होता. त्यावेळी त्यांनी अक्षय याचे सर्व्हिस सेंटर आहे, असे सांगितले होते. लग्नासाठी त्यांनी रोख 50 हजार रुपये दिले होते. त्यांना 3 वर्षाचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी आहे. अक्षय काही कामधंदा करत नसल्यामुळे तिचा आणि तिच्या मुलांचा खर्च तिचे वडिल खलसे हे करत होते.
( नक्की वाचा : कल्याणमध्ये स्टेशन परिसरात मसाज पार्लरमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, 10 महिलांची सुटका! )
अक्षय राखपसरे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने सीमा घरातील वाद त्यांना सांगत नसे. तिच्या घराचा पूर्ण कारभार तिचे चुलत सासरे वसंत राखपसरे हे पाहत होते. किरकोळ कारणावरुन अक्षय सीमा हिला मारहाण करत असे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहे. कोठेतरी नोकरी शोधा, असा सीमा अक्षयकडं आग्रह करत होती. त्यावरुन तिचे आणि तिच्या सासरच्या लोकांशी सतत वाद व्हायचे.
त्यावरुन तिचा पती तिला मारहाण करायचा. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांना मुलीच्या चुलत दिराच्या मोबाईलवरुन फिर्यादींना फोन आला. तुमच्या बहिणीच्या दशक्रिया विधीला सीमाला यायला मिळाले नाही म्हणून तिने फाशी घेतली. हे समजल्यावर ते तातडीने पुण्यात आले. पण त्यांना मुलीची तब्येत ठीक आहे, भेटायची आवश्यकता नाही, असे सांगून भेटू दिले नाही. डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सासरी होणार्या शारीरीक व मानसिक छळाला कंटाळून सीमा हिने फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात फुरसुंगी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |