पुणे पोर्शे अपघात प्रकरण : अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी 'रक्त' देणाऱ्या आईला अटक

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासंबंधात ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. ससून रुग्णालयात आरोपीचे रक्ताचे नमुने कोणा महिलेच्या रक्ताच्या नमुन्याशी बदलल्यात आल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या समितीला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा रक्ताचा नमुना कोणा महिलेच्या रक्तासोबत बदलण्यात आलं होतं. रक्ताचा नमुना बदलण्यासाठी आरोपीच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना तीन लाखांची लाच दिली होती. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्याच रक्ताच्या नमुन्यासोबत अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा संशय क्राइम ब्रँचकडून व्यक्त केला जात आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक केली आहे. यापूर्वी क्राइम ब्रँचने शिवानी अग्रवालची चौकशी केली होती. यानंतर ती आऊट ऑफ रीच होती. आपला  जबाब नोंदवल्यानंतर शिवानी अग्रवाल पोलिसांच्या संपर्कात नव्हती. मात्र आता तिला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

नक्की वाचा - दारुच्या नशेत 200 च्या स्पीडनं चालवत होता पोर्शे, मित्रांनीच उघड केलं रहस्य

विशाल अग्रवाल याचे हॉटेल काहीच वेळात सील करणार
पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचे महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब हॉटेल काहीच वेळात सील करण्यात येणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची आणखी एक मोठी कारवाई केली आहे. थोड्याच वेळात या कारवाईला सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासन कारवाईसाठी हॉटेल परिसरात दाखल झाली असून काही वेळात कारवाई सुरू करण्यात येईल. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात एम पी जी क्लबचा बार सील करण्यात आला होता

Advertisement