दारुच्या नशेत 200 च्या स्पीडनं चालवत होता पोर्शे, मित्रांनीच उघड केलं रहस्य

Pune Porshe Case : पुण्यातल्या बड्या बिल्डरचा मुलगा पबमधून परत येत होता त्यावेळी त्याच्या कारमध्ये त्याचे मित्रही होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Porshe Car Accident : अल्पवयीन आरोपीच्या मित्रांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
पुणे:

पुण्यात बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं पोर्शे कार चालवून दिलेल्या धडकेत  (Pune Porsche Car Accident) 2 आयटी इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली त्यावेळी 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत होता. त्याच धुंदीत तो पुण्याच्या रस्त्यावर त्याची लग्झरी कार पळवत होता. त्याची धडक लागल्यानं मुळचे मध्य प्रदेशातील अनीश आणि अश्विनी या दोन जणांचा मृत्यू झालाय. पुण्यातल्या बड्या बिल्डरचा मुलगा पबमधून परत येत होता त्यावेळी त्याच्या कारमध्ये त्याचे मित्रही होते. त्यांनी तो अल्पवयीन मुलगा दारु पिऊन 2.5 कोटी किंमती पोर्शे कार चालवत होता, असा दावा केलाय.  पोलिसांच्या सूत्रांनी ही माहिती एनडीटीव्हीला दिलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितलं की, अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा जीव घेणारी पोर्शे कार 200 किमी प्रती तास वेगानं धावत होती. या कारनं त्य दोघांची बाईक चिरडून टाकली. ही धडक इतकी भयानक होती की अश्विनी आणि अनिश हवेत उडाले आणि खाली पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संतप्त जमावानं मुलाला पकडलं तेव्हा तो नशेत वाटत होता. त्याला लोकांनी मारहाण देखील केली.

या मुलाच्या मित्रांनी आरोपी दारु पिऊन कार चालवत असल्याच्या चर्चेला दुजोरा दिलाय. या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. त्यामध्ये अल्पवयीन आणि त्याचे मित्र दारुच्या बाटल्यांची गर्दी असलेल्या टेबलाच्या भोवती बसलेले दिसत आहेत. अल्पवयीनला दारु दिल्याच्या आरोपात बार मालिक आणि कर्मचाऱ्यांना अटक करुन त्यांची चौकशी करण्यात आलीय. महाराष्ट्रातील कायद्यानुसार दारु पिण्यासाठी ती व्यक्ती किमान 25 वर्षांची असणं आवश्यक आहे. तर अल्पवयीन तरुणाचं वय फक्त 17 आहे. 

( नक्की वाचा : 'मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेन', पुणे पोर्शे दुर्घेटनेतील आरोपी डॉ. तावरेचा इशारा )
 

50 लाखांचा व्यवहार 

अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 50 लाखाचा व्यवहार झाला होता. त्यासाठी वॉट्सअप कॉलवर डिल करण्यात आले होते. हा कॉल डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अगरवाल यांच्यात झाल्याची माहिती आता चौकशीत उघड झाली आहे. विशेष म्हणजे एका माजी पोलीस अधिकाऱ्यानेही या प्रकरणात हस्तक्षेप करत बचावासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement

अल्पवयीन मुलाचा बाप विशाल अग्रवाल याने डॉक्टर अजय तावरे यांना संपर्क केला होता. तब्बल 15 वेळा या दोघांमध्ये व्हॉट्सअप संभाषण झाले होते. त्यात 50 लाखांचा व्यवहार या दोघांमध्ये ठरला. तावरे यांचा सहाय्यक श्रीहरी  हर्नोल याकडे पहिला हप्ता देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार हर्नोल याच्याकडे अडीच लाख कॅश पोहचवण्यात आली. तर, शिपाई अतुल घटकांबळे याच्याकडे पन्नास हजाराची रोख रक्कम देण्यात आली. हर्नोल याच्या चौकशीत या गोष्टी उघड झाल्या आहेत.