अदलाबदल भोवली, पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर मोठी कारवाई

Pune Porshe Case : मुख्य आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप असलेल्या 2 डॉक्टरांवर मोठी कारवाई करण्यात आलीय.

Advertisement
Read Time: 2 mins
Pune Porshe Case update : ससून हॉस्पिटलमधील 2 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई:

पुण्यातील पोर्शे दुर्घटना प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. या दोन्ही डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण विभागानं निलंबित केलंय. त्याचबरोबर बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉकटर विनायक काळे यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. म्हस्के यांच्याकडं हा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. 

'हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणात समिती नेमली होती. त्याचा अहवाल आला आहे.  यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यात असं प्रकरण त्यांना करता येणार नाही अशा प्रकारचे शिक्षा किंवा कारवाई होईल', अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रक्ताचे नमुने बदलले

डॉ. तावरे आणि डॉ. हरनोर यांच्यावर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदली केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणात त्या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आलीय. डॉ. अजय तावरे याने रक्ताचा नमुना घेण्याच्या दोन तासांपूर्वी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासोबत 14 वेळा फोनवरुन संभाषण केलं होतं, अशी माहिती आता उघड झालीय. 

पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीने अल्पवयीनच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यासाठी लाच घेतली होती. पोलिसांच्या तपासानुसार, अल्पवयीन मुलाचा रक्ताचा नमुना कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आला होता आणि त्याच्याऐवजी ज्या व्यक्तीने अल्कोहोल घेतलं नाही अशा व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली होती. 

( नक्की वाचा : 'मी शांत बसणार नाही, सर्वांची नावं उघड करेन', पुणे पोर्शे दुर्घेटनेतील आरोपी डॉ. तावरेचा इशारा )
 

डॉ. तावरे यांच्या सह आपात्कालिन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि रुग्णालयातील शवगृहात काम करणारा अतुल घाटकांबळेशी संबंधित ठिकाणींचा तपास घेतला जात आहे. पोलिसांनी डॉ. हळनोरकडून 2.5 लाख रूपये आणि घाटकांबळेकडून 50 हजार रूपये जप्त केले आहेत. 

Advertisement

एका पोलीस अधिकाऱ्यानं याबाबत माहिती देताना सांगितलं की, तपासात तो रक्ताचा नमुना महत्त्वपूर्ण पुरावा आहे. मात्र तो बदलण्यात आला. नमुदा बदलणे आणि तपासात आडकाठी आणण्याची संपूर्ण आयडिया डॉ. तावरेची होती. डॉ. तावरे यांच्या कॉल डिटेल्सनुसार रक्ताचा नमुना घेण्याच्या दोन तासांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप, फेसटाइम अशा वेगवेगळ्या माध्यमातून तावरे आणि अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात 14 वेळा फोन कॉल झाला. मात्र विशालने तावरेंशी संपर्क कसा केला, आणखी कोणी यामध्ये मध्यस्थी केली का, याचाही तपास केला जात आहे.