Pune News : पुण्यातील मेडिकल कॉलेजात रॅगिंग करणं भोवलं, तिन्ही डॉक्टरांवर मोठी कारवाई

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधील तीन कनिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तीन कनिष्ठ डॉक्टरांवर केलेल्या रॅगिंग प्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली असून निलंबित डॉक्टरांना महाविद्यालय आणि वसतिगृहात प्रवेशबंदी नाकारण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शैक्षणिक आणि परिषदांमध्येही या डॉक्टरांच्या सहभागावर बंदी आणण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येकी एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 28 एप्रिल रोजी आलेल्या तक्रारीनंतर चौकशी समितीने चार दिवसांत सखोल चौकशी करून ही कारवाई सुचवली आहे. पुण्यातील बी.जी.रॅगिंग प्रकरणात डॉ. अथर्व घोरपडे, डॉ. गौरव तिवारी आणि डॉ. राहुल जाधव यांनी रॅगिंग केल्याचे निष्पन्न झालं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याचा कारनामा; चेहऱ्यासाठी तब्बल 9 लाखांचे इंजेक्शन अन् बिल...

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार, वरिष्ठ निवासी डॉक्टरांकडून चार कनिष्ठ डॉक्टरांना दोन आठवडे शारिरीक त्रास देण्यात आला. याचा कनिष्ठ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला.  पुण्यासारख्या शहरामध्ये रॅगिंगसारखं गंभीर प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला.