पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गात शिकत असलेल्या मैत्रिणींचे न्यूज फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. विशेष म्हणजे त्यांनी हे फोटो मॉर्फ केले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. हीबाब शाळेतल्या शिक्षिकेच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने हा प्रकार त्या मुलींच्या पालकांच्या लक्षात आणून दिला. यामध्ये फोटो व्हायरल करणारे सर्व जण अल्पवयीन आहेत. शिवाय ज्यामुलींचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत त्याही अल्पवयीन आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा संपुर्ण प्रकार 16 ते 30 जूनमध्ये घडल्याचे तपासात समोर आले आहे. ही शाळा पुण्याच्या हडपसर भागात आहे. या शाळेचे चांगले नावही आहे. या प्रकरणातील पिडीत विद्यार्थीनी ही पण दहावीच्या वर्गात शिकते. ज्या विद्यार्थ्यांनी तिचे फोटो व्हायरल केले तेही तिच्याच वर्गात शिकतात. विशेष म्हणजे ते सर्वजण मित्र मैत्रिणी आहेत. त्यातील एक विद्यार्थी हा शाळा सोडून गेला आहे. पण तो त्याच्या मित्रांच्या संपर्कात होता, असं पोलिसांनी सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...
ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार केला त्यांनी आधी आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम हे अॅप घेतले. या अॅपवर त्यांनी त्या विद्यार्थ्यांनीचे फोटो अपलोड केले. ते मॉर्फ केले. ते सर्व फोटो हे न्यूड होते. हे फोटो जो विद्यार्थी शाळा सोडून गेला होता त्याला पाठवले. हा सर्व प्रकार त्यात वेळी शाळेच्या शिक्षिकेच्या लक्षात आला. यावेळी त्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना बोलून याबाबतची माहिती दिली.
ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?
ही बाब समजल्यानंतर पिडीत विद्यार्थीनीच्या पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये धाव घेतली. झालेला सर्व प्रकार पोलीसांना सांगितला. त्यानंतर पोलीसांनी तातडीने सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुलांना बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले. अशी माहिती पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे. या घटनेनं संपुर्ण शाळेत एकच खळबळ उडाली आहे. येवढ्या लहान मुलानी अशा नामांकीत शाळेत असा प्रकार करणे म्हणजे शाळेची प्रतिष्ठाच धुळीस मिळवण्या सारखी आहे अशी प्रतिक्रीया उमटत आहेत.