शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, अशी मागणी केली. शरद पवार, नाना पटोले यांच्यासमोरची उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवा आणि पुढे चला असं म्हटलं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, असा आग्रह उद्धव ठाकरे यांचा का आहे? यामागच राजकारण देखील समजून घेणे गरजेचं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाडापाडीचं राजकारण टाळलं जावं
सगळ्यात पहिलं कारण उद्धव ठाकरे यांनी स्वत:च सांगतलं की, भाजपासोबत युतीत असताना ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं धोरण होतं. मात्र यामध्ये पाडापाडीचं राजकारण व्हायचं. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री होईल यामुळे मित्रपक्षाकडून उमेदवार पाडले जाऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा आग्रह धरला असावा.
प्रभावी नेतृत्व
महाविकास आघाडीमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा प्रभावी नेतृत्व सध्यातरी नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी उ्त्तम काम केले असा दावा शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. त्यातही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंव्यतिरिक्त इतर कुणाचा विचार करायचा झाल्यास त्यावर एकमत होईल, याबाबत देखील साशंकता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करायचं झाल्यास उद्धव ठाकरे हेच प्रबळ दावेदार आहेत.
(नक्की वाचा- उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...)
विधानसभा निकालाचा परिणाम
2019 विधानसभा निकालाप्रमाणे सध्याची परिस्थिती नाही. शिवसेनेतील फुटीनंतर सध्याच्या शिवसेना ठाकरे गटाची ताकद तुलनेने कमी आहे. लोकसभा निवडणुकीत देखील ते पाहायला मिळालं. जागावाटपात सर्वाधिक जागा मिळवूनही निकालात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने तुलनेने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे विधानसभा जागावाटपात ठाकरे गटाची बार्गेनिंग पॉवर लोकसेभेपेक्षा कमी आहे. त्यात विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आणि पक्षाचे कमी आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगणे ठाकरे गटाला कठीण जाईल.
भाजपसोबत तुटलेल्या युतीत मुख्यमंत्रिपद कारण ठरलं होतं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा त्यावेळी दोन्ही पक्षांनी जाहीर केला नव्हता. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर केल्यास महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. दबावाचं राजकारण टाळता येऊ शकतं.
(नक्की वाचा- Raj Thackeray Movie : राज ठाकरेंची भूमिका साकारणारा 'तो' अभिनेता कोण? रिलीजबाबत हाती आली मोठी अपडेट)
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चेत असलेली नावे
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत आहेत. या नेत्यांचे कार्यकर्ते याबाबत उघडपणे वक्तव्य करताना देखील दिसतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world