पुण्यातील स्टिंग ऑपरेशननंतर 'तो' पब सील, 8 जणांविरोधात कारवाई; दोघे निलंबित   

पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन समोर आले आहे. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचना आणि उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून एफसी रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. काही निवडक तरुणांसाठी या पार्टीचं आयोजन केलं होतं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे प्रशासन खडबडून जागं झालं आहे.  

पुणे पोलीस आणि अबकारी कर विभागाकडून एफसी रोडवरील L3 - Liquid Leisure Lounge हा पब सील करण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 बारमालकांसह 1 मॅनेजर 1 डीजे 1 पार्टी आयोजक आणि 2 पार्किंग कर्मचारी यांचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण चार कलम लावत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ जणांना आज दुपारी पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहे. कामात हलगर्जीपणा केल्याने पुणे पोलीस दलातील दोन बिट मार्शलचे निलंबन करण्यात आले. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - पुण्यात पुन्हा 'उडता पंजाब', नामांकित हॉटेलमधील स्टिंग ऑपरेशन आलं समोर

पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता.  परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे. 

Advertisement

Advertisement