Pune News पुण्यातील अल कायदाच्या संशयित दहशतवाद्याचे 'ठाणे कनेक्शन' उघड! 'गुप्त बैठकी'बाबत ATS चा मोठा खुलासा

Pune Al-Qaeda Suspect Zuber Hangargekar : पुण्यातील जुबेर हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी जोडले गेल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Zuber Hangargekar: जुबेर हंगरगेकर (वय 37) याला 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
मुंबई:

Pune Al-Qaeda Suspect Zuber Hangargekar's Thane Connection : पुण्यातील जुबेर हंगरगेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी जोडले गेल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एक मोठीा बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या  महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यातील एका शिक्षकाची या प्रकरणात चौकशी केली आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार जुबेर हंगरगेकरनं मुंब्रामधील एका शिक्षकाची त्या घरी गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे एटीएसनं या शिक्षकाकडे जुबेरबद्दल चौकशी केली आहे.

जुबेर हंगरगेकरवर काय आरोप आहेत?

जुबेर हंगरगेकर (वय 37) याला 27 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्यावर अल-कायदा आणि अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS) सारख्या भारतात बंदी असलेल्या संघटनांशी संबंध ठेवल्याचा आणि लोकांना कट्टर बनवण्याच्या कामात (Radicalisation) सामील असल्याचा संशय आहे.

तपासामध्ये एटीएसला जुबेरच्या एका जुन्या फोनमध्ये पाकिस्तानचा संपर्क क्रमांक सेव्ह केलेला आढळला आहे.

( नक्की वाचा : Dr. Shaheen : 'लिबरल' डॉक्टर ते 'जैश'ची कमांडर... शाहीनने पतीला घटस्फोट का दिला? कारण समजल्यावर बसेल धक्का )
 

शिक्षकाच्या घरी काय घडले?

या प्रकरणाचा तपास करताना एटीएसला मुंब्रा कनेक्शन सापडलं. जुबेरनं त्याच्या काही महत्त्वाच्या भेटींपैकी एक भेट मुंब्रामध्ये घेतली होती.  या भेटीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी एटीएसचे अधिकारी मंगळवारी (11 नोव्हेंबर) संबंधित शिक्षकाच्या घरी गेले होते. त्यांनी शिक्षकाकडे जुबेर हंगरगेकर आणि त्याच्या भेटीबद्दल विचारणा केली.

Advertisement

मात्र, एटीएसने स्पष्ट केले आहे की, या शिक्षकाचा या गुन्ह्यामध्ये आरोप नाही, आणि ते फक्त माहिती देण्यासाठी चौकशीत मदत करत आहेत.

 घरातून काय जप्त झाले?

एटीएसने पुणे कोर्टात सांगितले की, जुबेर हंगरगेकर पुण्याच्या कोंढवा परिसरात लोकांना प्रक्षोभक (Aggressively) धार्मिक गोष्टी सांगत असे. त्याच्या घरावर झडती घेतली असता, पोलिसांना अनेक आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या:

Advertisement

जुबेरने डिलीट केलेल्या फाईल्स मिळाल्या. त्यात 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेन्ट (AQIS)' या संघटनेबद्दलची माहिती होती. त्याचबरोबर अल-कायदाचा संस्थापक आणि दहशतवादी ओसामा बिन लादेन याने ईद-उल-फितरला केलेल्या भाषणाचा उर्दू अनुवादही त्याच्या घरी सापडला. इतकंच नाही तर जुबेरकडं  'इन्स्पायर' नावाचे एक मासिक सापडले. यात AK-47 चालवण्याचे प्रशिक्षण आणि घरच्या घरी बॉम्ब (IED) कसा बनवायचा, याची माहिती देण्यात आली होती. 

परदेशी कनेक्शन?

एटीएसला जुबेरचा एक जुना फोन मिळाला. त्या फोनमधील संपर्क यादी (Contact List) तपासल्यावर त्यांना एकूण पाच आंतरराष्ट्रीय फोन नंबर सेव्ह केलेले दिसले. या पाचपैकी दोन क्रमांक हे सौदी अरेबियाचे तर पाकिस्तान, कुवेत आणि ओमान या देशातील प्रत्येकी एक क्रमांक होता. मात्र जुबेरनं या परदेशी नंबरवर फोन केल्याचे रेकॉर्ड आढळले नसल्याचं एटीएसनं स्पष्ट केलं. 

Advertisement
Topics mentioned in this article