Punjab News : पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (DGP) मोहम्मद मुस्तफा आणि पंजाबच्या माजी मंत्री रजिया सुल्ताना यांचा मुलगा अकील अख्तर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. पंचकूला पोलिसांनी मोहम्मद मुस्तफा, त्यांची पत्नी रजिया सुल्ताना, मुलगी आणि सूनेसह कुटुंबातील पाच सदस्यांच्याविरोधात हत्या आणि गुन्ह्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
ही एफआयआर अकीलचे शेजारी शमसुद्दीनच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आली. अकीलची पत्नी आणि त्याचे वडील मोहम्मद मुस्तफा यांच्यामध्ये अवैध संबंध होते. या कटामध्ये माजी मंत्री रजिया सुल्ताना यांचाही समावेश असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी व्हिडिओचा पुरावा...
पंचकूला मनसा देवी पोलीस ठाण्यात हे प्रकरण 16 ऑक्टोबरच्या रात्री अकील अख्तर (35) यांच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखल करून घेण्यात आला आहे. कुटुंबीयांनी आधी सांगितलं होतं की, अकीलचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे.
मात्र अकीलचा 27 ऑगस्टचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप लावला होता. व्हिडिओमध्ये त्याने वडील आणि पत्नीमधील अवैध संबंधाचा उल्लेख केला होता.
पोलिसांनी शेजारील शमसुद्दीनची तक्रार आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारावर मोहम्मद मुस्तफा, त्याची पत्नी रजिया सुल्ताना (पंजाबचे माजी मंत्री), पूत्रवधू आणि मुलीच्याविरोधात हत्या, गुन्हेगारी कट आखण्यासंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे आणि व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली जात आहे.
अकीलचे शेजारी शमसुद्दीनच्या तक्रारीवर FIR दाखल केली आहे.